काटाेल : ऑनलाईन क्लाससाठी वडिलांनी माेबाईल खरेदी करून न दिल्याने रागाच्या भरात इयत्ता नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने घरी कुणाचेही लक्ष नसताना गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना काटाेल शहरात गुरुवारी (दि. २२) दुपारी घडली.
लावण्य शंकरराव उबाळे (१४, रा. पंचवटी, काटाेल) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. लावण्यचे वडील डाेंगरगावच्या साेलार कंपनीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून नाेकरी करतात. ती काटाेल शहरातील रुईया हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकायची. काेराेना संक्रमणामुळे शाळा बंद असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेऊ नये म्हणून शाळांनी ऑनलाईन वर्ग घ्यायला सुरुवात केली. ऑनलाईन वर्गासाठी तिने वडिलांना नवीन फाेन विकत घेऊन मागितला हाेता. सध्या दुकाने बंद असल्याने ते सुरू हाेताच नवीन माेबाईल खरेदी करणार असल्याचेही वडिलांनी तिला सांगितले हाेते. दरम्यान, वडील माेबाईल विकत घेऊन देत नसल्याचा गैरसमज करून घेत तिने रागाच्या घरात गुरुवारी दुपारी खाेलीत गळफास लावून घेतला. ही बाब सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास निदर्शनास आली. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी काटाेल शहरातील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी काटाेल पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक राहुल बाेंद्रे करीत आहेत.