काटाेल : वडिलांनी ऑनलाईन क्लाससाठी नवीन माेबाईल खरेदी करून न दिल्याने शालेय विद्यार्थ्याने रागाच्या भरात घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. हीघटना काटाेल शहरात गुरुवारी (दि. २२) दुपारी घडली.
लावण्य शंकरराव उबाळे (१४, रा. पंचवटी, काटाेल) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. लावण्य हा काटाेल शहरातील बनारसीदार रुईया विद्यालयात इयत्ता नववीत शिकायचा. त्याने वडिलांना ऑनलाईन क्लाससाठी नवीन माेबाईल घेऊन मागितला हाेता. वडिलांनी सध्या दुकाने बंद असल्याने नंतर खरेदी करून देताे, अशी ग्वाही त्याला दिली हाेती. मात्र, त्याने यावर विश्वास न ठेवता रागाच्या भागात कुणाचेही लक्ष नसताना खाेलीत छताला गळफास लावून आत्महत्या केली. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी पाेलिसांना सूचना दिली. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी काटाेल शहरातील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी काटाेल पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूची नाेंद केली असून, या घटनेचा तपास पाेलीस हवालदार पंचफुला माेरे करीत आहेत.