लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आईवडिलांसमोर अपमान केल्यामुळेअल्पवयीन विद्यार्थ्याने मित्राच्या मदतीने कौस्तुभ सवाईचा खून केला होता. पोलिसांनी खुनाच्या सूत्रधारासह दोन अल्पवयीन व त्यांच्या एका साथीदाराला अटक केली आहे.राहुल रमेश येरपुडे (१८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. रामभूमी सोसायटी पारडी येथील रहिवासी १७ वर्षीय कौस्तुभ दामोदर सवाईचा २९ सप्टेबरला कामठीच्या घोरपडमध्ये खून करण्यात आला होता. त्याच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून ३० सप्टेबरला पारडी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. २ ऑक्टोबरला घोरपड येथे मृतदेह सापडला. ३ ऑक्टोबरला मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलीस कौस्तुभच्या मित्रांच्या तपासात लागले. पोलिसांना २९ सप्टेबरला सकाळी कौस्तुभ आपल्या वयाच्या आरोपीसोबत दिसल्याची माहिती मिळाली. चौकशीत त्याने कौस्तुभला भवानी मंदिर गेटजवळ सोडल्याचे सांगितले.पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याने राहुल येरपुडेच्या मदतीने खून केल्याची माहिती दिली. राहुलला अटक केल्यानंतर एका दुसऱ्या अल्पवयीन गुन्हेगाराची माहिती मिळाली. त्यालाही पकडण्यात आले. कौस्तुभ आणि सूत्रधार १७ वर्षाचा विद्यार्थी जुने मित्र आहेत. डीजे समोर नाचण्यावरून कौस्तुभचा सूत्रधाराशी २८ सप्टेबरला वाद झाला होता. कौस्तुभने आरोपीचा त्याच्या आईवडिलांसमोर अपमान केल्यामुळे तो संतापला होता. त्याने कौस्तुभचा खुन करण्याचे ठरविले. त्याने राहुल येरपुडेला आपल्या योजनेत सामील केले. राहुल प्लंबरचे काम करतो. तो कौस्तुभचा लहानपणीचा मित्र आहे. योजनेनुसार २९ सप्टेबरला सूत्रधार आणि राहुलने कौस्तुभला अॅक्टिव्हावर बसवून कामठी घोरपडला नेले. तेथे त्यांनी कौस्तुभशी वाद घातला. दरम्यान सूत्रधाराने कौस्तुभच्या डोक्यावर वार केला. राहुलने त्याला पकडून ठेवले. त्यानंतर कौस्तुभ जीव वाचविण्यासाठी पळत असताना दोघांनीही त्याचा पाठलाग करून दगडाने ठेचून त्याचा खून केला. मृतदेहाला शेतात फेकून कौस्तुभचा मोबाईल घेतला. घटनास्थळ निर्जन असल्यामुळे घटनेची कुणालाच माहिती मिळाली नाही. खुनानंतर त्यांनी एका दुसºया अल्पवयीन मित्राला फोन करून घटनेची माहिती दिली. दोघेही हर्षच्या तुमसर येथील घरी गेले. तेथे कपडे बदलून त्याला कौस्तुभचा मोबाईल सोपविला. तेथून ते नागपुरात परतले. ही कारवाई पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार संतोष बाकल, उपनिरीक्षक विनोद धोंगडे, ज्ञानेश्वर कांडेकर, हवालदार ज्ञानचंद दुबे, पप्पु यादव, प्रमोद वाघ, वेद यादव, मंगेश लांजेवार, मंगेश यादव, राजेंद्र टाकळीकर, मंगेश गिरी, सतीश ठाकुर, सुधीर कनोजिया, ललित शेंडे यांनी पार पाडली.
अपमानास्पद वागणुकीमुळे केला होता विद्यार्थ्याचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2019 10:44 PM
आईवडिलांसमोर अपमान केल्यामुळेअल्पवयीन विद्यार्थ्याने मित्राच्या मदतीने कौस्तुभ सवाईचा खून केला होता. पोलिसांनी खुनाच्या सूत्रधारासह दोन अल्पवयीन व त्यांच्या एका साथीदाराला अटक केली आहे.
ठळक मुद्देअल्पवयीन सूत्रधारासह तिघांचा समावेश : नवी कामठी पोलिसांची कारवाई