लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बाबासाहेबांचा शाळा प्रवेश ही मोठी क्रांतिकारक घटना होती. ते महान विद्वान होते परंतु त्यापेक्षा ते शीलवान आणि आदर्श विद्यार्थी होते. जातीयवादाचे चटके सहन करीत वर्गाबाहेर शिकूनही त्यांनी या देशाचा उद्धारच केला. आज विद्यार्थ्यांना थोडासा अभ्यास करताना चहा किंवा कोणत्याही व्यसनाची गरज भासते. बाबासाहेबांना १८ तास अभ्यास करूनही कधी या व्यसनाची गरज भासली नाही. कारण त्यांनी जीवनाचे ध्येय ठरविले होते. विद्यार्थ्यांनी त्यांचे आदर्श अंगिकारले पाहीजे, असे आवाहन आमदार डॉ. मिलिंद माने यांनी केले.समाज कल्याण विभाग, नागपूर मुख्यालय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान यांच्यावतीने मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन विद्यार्थी दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाचे संचालक संजय मीना, समाज कल्याणचे सहायक आयुक्त विजय वाकुलकर, जिल्हा जाती पडताळणी समितीचे उपायुक्त आर.डी. आत्राम आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. माने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संविधानातील आरक्षणाच्या तरतुदीमुळे उच्चवर्णीय लोक बाबासाहेबांचा द्वेष करतात. मागासवर्गीय विद्यार्थ्यांची आरक्षण, शिष्यवृत्तीमुळे प्रगती झाली असे गृहीत धरले जाते. हे अर्धवट सत्य आहे. मागासवर्गीयांची आरक्षणामुळे नाही तर बाबासाहेबांच्या आदर्शामुळे प्रगती झाली आहे. संधी मिळत असली तरी प्रत्येकाला आपली क्षमता सिद्ध करावीच लागते. बाबासाहेबांचे हे महात्म्य सर्व समाजाला समजले पाहीजे.विद्यार्थी दिनाच्या माध्यमातून शाळांमध्ये विद्यार्थी निबंध, वक्तृत्व स्पर्धेत बाबासाहेबांच्या जीवनाचा अभ्यास करतील. आज महाराष्टÑात हा दिवस साजरा होत आहे. भविष्यात देशभरात आणि जगभरात हा आदर्श दिवस साजरा होईल असा विश्वास डॉ. माने यांनी व्यक्त केला.यावेळी संजय मीना, आर.डी. आत्राम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी प्रास्ताविकातून विभागाच्या सर्व वसतिगृहात, शाळांमध्ये हा दिवस साजरा होत असल्याचे सांगितले. आर्थिक कारणामुळे पुढे जाऊ शकत नसलेल्या वंचित घटकातील विद्यार्थ्यांना समता प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रवेशद्वार मिळेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. समता प्रतिष्ठानचे लेखाधिकारी शिलसागर चहांदे यांनी आभार मानले.
विद्यार्थ्यांनो, बाबासाहेबांचे आदर्श अंगिकारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 1:12 AM
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बाबासाहेबांचा शाळा प्रवेश ही मोठी क्रांतिकारक घटना होती. ते महान विद्वान होते परंतु त्यापेक्षा ते शीलवान आणि आदर्श विद्यार्थी होते. जातीयवादाचे चटके सहन करीत वर्गाबाहेर शिकूनही त्यांनी या देशाचा उद्धारच केला. आज विद्यार्थ्यांना थोडासा अभ्यास करताना चहा किंवा कोणत्याही व्यसनाची गरज भासते. बाबासाहेबांना १८ तास अभ्यास ...
ठळक मुद्देमिलिंद माने : समाज कल्याण विभागात विद्यार्थी दिन साजरा