नागपूर : राज्य शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. त्यानुसार विविध अभ्यासक्रमात ॲडमिशनसाठी पालक आणि विद्यार्थ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. तत्पूर्वी कागदपत्रांची जुळवाजुळव महत्त्वाची असून त्यासाठी धावपळ वाढली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी काेणत्याही अभ्यासक्रमासाठी जाताना आवश्यक ती कागदपत्रे पूर्ण आहेत की नाही, याची शहानिशा करणे गरजेचे आहे. शिवाय अर्ज भरताना ताे अचूक भरला जाईल, याचीही काळजी घेणे आवश्यक आहे.
मेडिकल प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे
१. नीट ऑनलाईन फाॅर्म प्रिन्ट
२ नीटप्रवेश पत्र व नीट मार्कलिस्ट
३. मार्क मेमो १० वी, सनद १० वी, मार्क मेमो १२ वी
४. नॅशनॅलिटी सर्टिफिकेट
५. रहिवाशी प्रमाणपत्र, आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र किंवा वडिलांचा फाॅर्म नं १६
६. १२ वीची टी. सी.
७. मेडिकल सर्टिफिकेट फिटनेस
८. मुलाचे राष्ट्रीय बँकेतील खाते
९. मुलाचे तसेच आई व वडिलांचे दोघांचे पॅनकार्ड
मागासवर्गीयांसाठी वरील सर्व व खालील प्रमाणपत्रे
१. जातीचे प्रमाणपत्र
२. जातवैधता प्रमाणपत्र
३. नाॅन क्रिमिलेयर प्रमाणपत्र
- इतर काेणत्याही अभ्यासक्रमात प्रवेश घेताना शैक्षणिक प्रमाणपत्रांसह हे दस्तावेज आवश्यक.
१) जाती प्रमाणपत्र
२) जातीवैधता प्रमाणपत्र
३) नॉनक्रिमिलेयर प्रमाणपत्र
४) डोमिसाइल प्रमाणपत्र
५) ईडब्ल्यूएस वर्ग प्रमाणपत्र
६) दिव्यांगता प्रमाणपत्र
७) आधार क्रमांक, बँक खाते
८) सैन्यदल वर्गाचे प्रमाणपत्र
९) अल्पसंख्याक वर्गाचे प्रमाणपत्र
फॉर्म भरताना हे लक्षात ठेवा.
- अर्ज भरायला जाताना मार्कलिस्ट, जातीचा दाखला, नागरिकत्व, आधार कार्ड आणि घराच्या पत्त्याच्या पुराव्याची अटेस्टेड कॉपी न्यायला विसरू नका. पासपोर्ट आकाराचा फोटो, डिंक, त्याचबरोबर कागदपत्रे जोडण्यासाठी स्टेपलर जवळ ठेवा.
- विद्यार्थ्यांचे नाव, पत्ता, ई-मेल, नागरिकत्व, जन्मतारीख, जन्मस्थळ इत्यादींची माहिती अर्जात दिलेल्या पद्धतीनेच भरावी.
उदा.- आडनाव, पालकांचे नाव, स्वतःचे नाव योग्य रकान्यातच लिहावे. इंग्रजीमध्ये अर्ज भरल्यास तो कॅपिटल लेटरमध्ये भरावा.
या गाेष्टी आवर्जून लक्षात ठेवा
- अर्ज चुकू नये म्हणून सुुरुवातीला त्याच्या झेरॉक्सवर माहिती भरा. त्यानंतर अर्जात ती माहिती भरा. एखादा मुद्दा न कळल्यास मार्गदर्शन घ्या.
- अर्ज भरायच्या तारखा आणि वेळापत्रकाचे कसोशीने पालन करा.
- इतर क्षेत्रांमध्ये मिळवलेल्या प्रमाणपत्रांच्या अटेस्टेड कॉपी बरोबर ठेवा.
- बऱ्याच वेळेला ऑनलाइन अर्जप्रक्रिया पूर्ण करायच्या असतात. त्यासाठी संबंधित कागदपत्रे स्कॅन करा. ते पेनड्राइव्हवर सेव्ह करून ठेवा आणि तो आपल्या जवळ बाळगा.