रेवराल : माैदा तालुका विधिसेवा समिती व पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने माैदा पाेलीस ठाण्याच्या आवारात कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी विद्यार्थ्यांना रस्ते वाहतूक सुरक्षा नियमन कायद्याची विस्तृत माहिती देण्यात आली.
अध्यक्षस्थानी प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी वानखेडे हाेते तर प्रमुख अतिथी म्हणून ठाणेदार हेमंतकुमार खराबे, तालुका विधी समितीचे ॲड. कांबळे उपस्थित हाेते. यावेळी विद्यार्थ्यांना पाेलीस ठाण्याचे कामकाज व हत्यार यांची माहिती देण्यात आली. रस्ते अपघात टाळण्यासाठी रस्त्याच्या डाव्या भागाला चालणे, वाहने चालविताना माेबाईल फाेनवर न बाेलणे, दुचाकी चालविताना हेल्मेटचा तर कार चालविताना सीटबेल्टचा वापर करावा, यासह अन्य सूचनाही देण्यात आल्या. काही समस्या अथवा अडचणी आल्यास पाेलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमात २०० विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाल्या हाेत्या. संचालन पोलीस काॅन्स्टेबल ओमकार तिरपुडे यांनी केले तर रामटेके यांनी आभार मानले. यशस्वितेसाठी सुधीर ज्ञानबोरवार, मनोहर जंगवाड, मनिराम भुरे, राजेंद्र तायडे, शिवाजी नागरे, नितीन सार्वे, केशव फड, संजू बरोदिया या पाेलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
200821\1752-img-20210820-wa0030.jpg
रस्ते वाहतुक सुरक्षा नियमन कायदे संबंधी माहिती