लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पूरपरिस्थितीमुळे पूर्व विदर्भातील अनेक विद्यार्थ्यांना ‘जेईई-मेन्स’ देता आली नाही. अशा विद्यार्थ्यांवर कुठल्याही प्रकारे अन्याय होणार नाही अशी भूमिका केंद्र व राज्य शासनाने स्पष्ट केली आहे. जे विद्यार्थी १ ते ६ सप्टेंबर या कालावधीत नागपुरातील केंद्रांवर परीक्षा देऊ शकलेले नाहीत किंवा जे देऊ शकणार नाहीत, त्यांनी लेखी अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.मध्य प्रदेशमध्येदेखील दमदार पाऊस झाल्यामुळे तेथील धरणांचे दरवाजे उघडण्यात आले. नागपूर जिल्ह्यासह पूर्व विदर्भात पूरपरिस्थिती निर्माण झाली व यामुळे अनेक विद्यार्थ्यांची अडचण झाली. विदर्भासाठी नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती आणि अकोला हे परीक्षा केंद्र आहेत. पावसामुळे काही गावांचा संपर्क तुटला असून पूलदेखील पाण्याखाली गेले. अशा स्थितीत गावांपासून परीक्षेच्या शहरात पोहोचता आले नाही. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये अशी मागणी पालकांकडून करण्यात आली होती.कुठल्याही स्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये असे राज्य शासनाकडून सांगण्यात आले. पूरपरिस्थितीमुळे परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांनी लेखी अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. हवामान खात्याच्या सूचनेनुसार वादळी वारा, पाऊस, अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे व त्यामुळे पूरपरिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर पुढेदेखील विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता आले नाही तर त्यांनी ‘एनटीए’कडून नियुक्त करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय एजन्सीमार्फत लेखी निवेदन सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले.
जेईई देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज करावे : जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2020 9:06 PM
पूरपरिस्थितीमुळे पूर्व विदर्भातील अनेक विद्यार्थ्यांना ‘जेईई-मेन्स’ देता आली नाही. अशा विद्यार्थ्यांवर कुठल्याही प्रकारे अन्याय होणार नाही अशी भूमिका केंद्र व राज्य शासनाने स्पष्ट केली आहे. जे विद्यार्थी १ ते ६ सप्टेंबर या कालावधीत नागपुरातील केंद्रांवर परीक्षा देऊ शकलेले नाहीत किंवा जे देऊ शकणार नाहीत, त्यांनी लेखी अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
ठळक मुद्देपूरपरिस्थितीचा फटका