लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारत केवळ भौगोलिकदृष्टीनेच नाही तर सांस्कृतिकदृष्टीनेही समृद्ध आहे. याच संस्कृतीची झलक विद्यार्थ्यांच्या सादरीकरणात मी पाहिली. आरडी परेडमध्ये प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या या विद्यार्थ्यांनी आज नागपुरात दिल्लीच्या राजपथाची अनुभूती दिली, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिल्ली जिंकून आलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या प्रांगणात रविवारी आयोजित कौतुक सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या विद्यार्थ्यांचे कौतुक करीत त्यांच्या भविष्यातील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आ. परिणय फुके हेसुद्धा या कौतुक सोहळ्यात सहभागी झाले होते. या मान्यवरांच्या हस्ते बेरदी नृत्य सादर करणाºया १६० विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या चमूचे प्रशिक्षक किशोर हम्पीहोळी यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले. संचालन श्वेता शेलगांवकर यांनी केले.
गीतांजलीच्या कथ्थकने जिंकलेया समारोहाचे दुसरे सत्र नृत्यांनी रंगले. दिल्लीहून आलेल्या गीतांजली शर्मा यांनी सर्वप्रथम प्रस्तुती दिली. नमो शिवाय या कथ्थक नृत्याद्वारे त्यांनी मंचावर शिवमहिमा साकारला. त्यांची द्वितीय प्रस्तुती असलेला कृष्णा-राधा संवादही प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून गेला.
गुलाबी थंडीत लावणीचा तडकायवतमाळहून आलेली स्नेहा कोडापे आणि त्यांच्या चमूने गुलाबी थंडीत लावणीच्या तडक्याने रंग भरला. मनीषा थापा या गुणी गायिकेच्या कसदार आवाजात या नृत्यांगनांनी फटकेबाज लावणी सादर केली. ‘सांगा न कशी मी दिसते नऊवारी साडीत...’ या लावणीपासून सुरू झालेला हा प्रवास पुढे खेळताना ‘रंग बाई होळीचा...’ ‘ रेशमाच्या रेघांनी...’ असा खडी लावणीमार्गे ‘झाल्या तिन्ही सांझा...’ या बैठकीच्या लावणीजवळ येऊन विसावला.