शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

विद्यार्थ्यांचा नशिबी ‘योग’ आलाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 1:10 AM

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाचा महाविद्यालयांवर फारसा वचक नसल्याची अनेकदा ओरड होते. बुधवारी जगभरात साजऱ्या करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने ही बाब परत एकदा समोर आली आहे. नागपूर विद्यापीठाने पाठविलेल्या निर्देशांना अनेक महाविद्यालयांनी चक्क वाटाण्याच्या अक्षताच दाखविल्या. बऱ्यांच महाविद्यालयांमध्ये हा दिवस साजरा करणे तर सोडाच विद्यार्थ्यांना माहिती देण्याची तसदीदेखील घेण्यात आली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

ठळक मुद्देनागपूर विद्यापीठ : बहुतांश महाविद्यालयांकडून प्रशासनाच्या निर्देशांना वाटाण्याच्या अक्षता

लोकमत न्यूज नेटवर्क  नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाचा महाविद्यालयांवर फारसा वचक नसल्याची अनेकदा ओरड होते. बुधवारी जगभरात साजऱ्या करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने ही बाब परत एकदा समोर आली आहे. नागपूर विद्यापीठाने पाठविलेल्या निर्देशांना अनेक महाविद्यालयांनी चक्क वाटाण्याच्या अक्षताच दाखविल्या. बऱ्याच महाविद्यालयांमध्ये हा दिवस साजरा करणे तर सोडाच विद्यार्थ्यांना माहिती देण्याची तसदीदेखील घेण्यात आली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव संमत केला होता. त्यानुसार अगदी वॉशिंग्टनपासून जगभरात विविध ठिकाणी योग दिवस साजरा करण्यात आला. नागपूर विद्यापीठातदेखील योग दिवस साजरा करण्यात यावा, असे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोग, राज्य शासन तसेच राजभवनातर्फे देण्यात आले होते. विद्यापीठातर्फे संलग्नित महाविद्यालयांच्या प्राचार्यांना ४ जून रोजी पत्र लिहून याची अंमलबजावणी करण्याची सूचना दिली होती. यानिमित्ताने योगाबद्दल प्रचार-प्रसार करणाºया ‘फिल्मस्’ दाखविणे तसेच प्रचारसाहित्याचे विद्यार्थ्यांमध्ये वाटप करण्याचे निर्देशदेखील देण्यात आले होते.काही मोजक्या महाविद्यालयांनी योग दिवसानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन केले. मात्र बहुतांश महाविद्यालयांनी याकडे दुर्लक्षच केले. शैक्षणिक सत्र सुरू झाले असले तरी अद्याप वर्गांमध्ये हवी तशी गर्दी दिसून येत नसल्याचे चित्र आहे. अनेक महाविद्यालयांनी हा उपक्रम राबविण्याची तसदीच घेतली नाही. बºयाच ठिकाणी तर सूचनाफलकावर साधी सूचना लावण्याचीदेखील तसदी घेण्यात आली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.विद्यापीठाचीदेखील ‘लेटलतिफी’आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यासंदर्भात १९ मे रोजी निवासी उपजिल्हाधिकाºयांनी राज्य शासनाच्या निर्देशाबाबत कळविले होते. त्याचे पत्रदेखील पाठविण्यात आले. मात्र प्रत्यक्षात विद्यापीठातर्फे ४ जून रोजी प्राचार्यांना पत्र पाठविण्यात आले व संकेतस्थळावर ही नोटीस १९ जून रोजी ‘अपलोड’ करण्यात आली. त्यामुळे महाविद्यालयांतदेखील हवी तशी वातावरणनिर्मिती होऊ शकली नाही.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठnagpurनागपूर