लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील अनेक सर्पमित्रांद्वारे साप पकडण्यासाठी ५०० ते १००० रुपये वसूल करण्यासोबतच सापांचे प्रदर्शन करण्याच्या घटना पुढे येत आहेत. अनेक नवशिके साप कसा पकडायचा हे शिकल्यानंतर बहादुरी दाखविण्यासाठी स्टंटबाजी करीत आहेत. अनेकदा काही सर्पमित्र विषारी साप हातात पकडून त्यांच्यासोबत स्टाईलमध्ये फोटो काढत आहेत. त्यांचे हे कृत्य जीवघेणे ठरू शकते. परंतु वन विभागातर्फे ठोस कारवाई होत नसल्यामुळे त्यांचा बंदोबस्त होत नसल्याचे वास्तव आहे.सामान्यपणे अशा सर्पमित्रात विषारी ब्लॅक कोबरासह इतर साप हातात पकडणे, कधी कधी सापाला जमिनीवर ठेवून त्याच्यासमोर झोपून काढलेले फोटो व्हॉट्सअप प्रोफाईलवर ठेवण्याची क्रेझ वाढली आहे. अशा प्रकारचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होतात. काही नागरिकांनी असे फोटो फेसबुकवर अपलोड केले आहेत. काही सर्पमित्रांनी यापुढे जाऊन स्टंटबाजीचे व्हिडीओसुद्धा तयार करून यु ट्युबवर टाकले आहेत. हे व्हिडीओ पाहून इतर अप्रशिक्षित युवकांना साप पकडून स्टंटबाजी करण्याची प्रेरणा मिळू शकते. अशा वेळी युवकांचे हे कृत्य धोकादायक आहे. परंतु यावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण होत नसल्यामुळे हे प्रकार बिनधास्तपणे सुरू आहेत.कोठे सक्रिय आहेत स्टंटबाजसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही स्टंटबाज सर्पमित्र हिंगणाच्या पलाई मेंढा, डेग्माच्या महादेवखोरी आणि गोरेवाडा वनक्षेत्राच्या आजूबाजूला सक्रिय आहेत. या वन क्षेत्रात जाऊन काही सर्पमित्र आपल्या सहकाऱ्यांसह सापासोबत फोटो काढतात.फोटो पाठवा, कारवाई करूवन विभागाच्या नागपूर सर्कलचे विभागीय अधिकारी (व्हिजिलन्स) एस. के. त्रिपाठी यांनी अशा सर्पमित्रांचे स्टंटबाजी करतानाचे फोटो सोशल मीडियावर अपलोड झाल्यास किंवा व्हायरल झाल्यास तपासानंतर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. वन्यजीव प्रेमींनी किंवा नागरिकांनी असे फोटो मिळाल्यास वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवावे. अशा व्यक्तींना शोधून वन्यजीव कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल.काही जणांचा शोध सुरूसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार व्हिजिलन्सला काही सर्पमित्रांचे स्टंटबाजी करतानाचे फोटो मिळाले आहेत. अशा व्यक्तीचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश वन अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
विषारी साप पकडून स्टंटबाजी ! सापांचे प्रदर्शन, असे कृत्य ठरू शकते जीवघेणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2019 11:16 PM
शहरातील अनेक सर्पमित्रांद्वारे साप पकडण्यासाठी ५०० ते १००० रुपये वसूल करण्यासोबतच सापांचे प्रदर्शन करण्याच्या घटना पुढे येत आहेत. अनेक नवशिके साप कसा पकडायचा हे शिकल्यानंतर बहादुरी दाखविण्यासाठी स्टंटबाजी करीत आहेत. अनेकदा काही सर्पमित्र विषारी साप हातात पकडून त्यांच्यासोबत स्टाईलमध्ये फोटो काढत आहेत. त्यांचे हे कृत्य जीवघेणे ठरू शकते. परंतु वन विभागातर्फे ठोस कारवाई होत नसल्यामुळे त्यांचा बंदोबस्त होत नसल्याचे वास्तव आहे.
ठळक मुद्देव्हॉट्सअप प्रोफाईल, फेसबुकवर फोटो अपलोड करण्याची क्रेझ