लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीतील बलात्कार आणि विनयभंगाच्या घटनांची मालिका सुरूच आहे. एमआयडीसीत पुन्हा एका १४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्याचे उघडकीस आले असून, हुडकेश्वर तसेच प्रतापनगरात विनयभंगाचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत.एमआयडीसीतील आरोपी रवी बाबूराव सोमकुंवर (वय ४५) याने त्याच्या नात्यातील १४ वर्षीय मुलीवर ८ ते १२ एप्रिलदरम्यान चार ते पाचवेळा बलात्कार केला. आईला आणि भावाला मारण्याची धमकी देऊन आरोपी तिच्यावर अत्याचार करीत होता. या प्रकाराची मुलीने तिच्या आईला माहिती दिल्यानंतर सोमवारी रात्री एमआयडीसी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलीस उपनिरीक्षक एन. ए. मदनकर यांनी बलात्कार तसेच पोक्सो कायद्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.मायलेकींना मारहाण१७ एप्रिलच्या दुपारी १२.१५ च्या सुमारास हुडकेश्वरमधील १७ वर्षीय युवती तिच्या आजी-आजोबाला बसथांब्यावर सोडण्यासाठी गेली होती. घरी परत येत असताना तिच्याच वस्तीत राहणारा आरोपी दद्दू बाळबुधे (वय २२) याने तिला अडवले. तिचा हात पकडून तिच्यासोबत लज्जास्पद वर्तन केले. युवतीने हा प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यामुळे आईने आरोपी बाळबुधेला विचारणा केली असता त्याने दोन्ही मायलेकींना अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली. युवतीने दिलेल्या तक्रारीवरून फिर्यादीचा हात पकडून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केला. हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.भाडेकरूने केली मारहाणचिचोली मोहाली (जि. भंडारा) येथील रहिवासी असलेला आरोपी संदीप शालिकराम बाहे (वय ३०) प्रतापनगरात पीडित महिलेच्या (वय ३४) घरी भाड्याने राहतो. रविवारी रात्री ७.३० च्या सुमारास महिलेचा पती घरी नसल्याचे पाहून आरोपी संदीपने महिलेशी नको त्या भाषेत बोलणी केली. महिलेने विरोध केला असता आरोपीने तिला थापड लगावून जीवे मारण्याची धमकी दिली. महिलेने आधी पतीला ही माहिती सांगितली. त्यानंतर प्रतापनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.
उपराजधानीत बलात्कार आणि विनयभंगाचे गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 1:20 AM
उपराजधानीतील बलात्कार आणि विनयभंगाच्या घटनांची मालिका सुरूच आहे. एमआयडीसीत पुन्हा एका १४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्याचे उघडकीस आले असून, हुडकेश्वर तसेच प्रतापनगरात विनयभंगाचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत.
ठळक मुद्देआरोपींकडून धमकी अन् मारहाणही : सर्वत्र संतापाचे वातावरण