शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
2
"महायुतीत मुख्यमंत्री पदासाठी कुठलीही रस्सीखेच नाही, कुणीही मागणी केलेली नाही"; फडणवीस स्पष्टच बोलले
3
"जिवंत राहायचं असेल तर...", अभिनेता सलमान खानला पुन्हा लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी
4
IPL 2025 मेगा लिलाव कधी होणार? समोर आली महत्त्वाची अपडेट; स्टार खेळाडू होणार मालामाल
5
मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार?
6
राज्यात ‘एमआयएम’चे १५ उमेदवार, एकाला पाठिंबा, मुस्लिम मतविभाजन टाळण्यासाठी कमी उमेदवार
7
आजचे राशीभविष्य, ५ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, अपूर्ण कामे तडीस जातील
8
विमान प्रवाशांसाठी मोठी बातमी! फ्लाइटमध्ये इंटरनेट वापरण्याबाबत सरकारचा नवीन नियम
9
शेअर बाजारात सलग दुसऱ्या घसरणीसह सुरुवात; Nifty च्या 'या' स्टॉक्समध्ये जोरदार विक्री
10
अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प-हॅरिस यांच्यात हाेणार ऐतिहासिक लढत
11
"तुम्ही सरळ जसप्रीत बुमराहला कॅप्टन करा अन् रोहित शर्माला सांगा..."; सुनील गावसकर यांची संतप्त प्रतिक्रिया
12
Suzlon Shares: वर्षभराच्या उच्चांकापेक्षा २२ टक्क्यांनी घसरला शेअर; खरेदीची संधी की आणखी घसरणार भाव?
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: बंडखोर बनणार का 'किंगमेकर'? तब्बल १५७ उमेदवार रिंगणात
14
कोणताही गाजावाजा न करता 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने साधेपणाने केलं लग्न, सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव
15
Reliance Jio IPO : मुकेश अंबानी केव्हा आणणार देशातील सर्वात मोठा आयपीओ? मोठी अपडेट आली समोर, पाहा संपूर्ण डिटेल्स
16
बार्शीत ५ जरांगे-पाटील समर्थकांची माघार; एकजण मात्र दिवसभर नॉटरिचेबल!
17
राज्यात बंडखोरीचा सार्वत्रिक उद्रेक, तब्बल १५७ बंडखोर रिंगणात, कुठे कुठे काय स्थिती?
18
बंडखोरांमुळे महायुती आणि मविआलाही जबर धक्के; यंदा वाढणार रंगत
19
ठाण्यात वर्चस्वाची लढाई; १९ मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी बंडखोरीचे ग्रहण, जिल्ह्यात शिंदेसेना, उद्धवसेनासह भाजपही मोठा भाऊ होण्यासाठी प्रयत्नशील
20
अतुल सावेंसमोर हॅट्ट्रिकचे आव्हान, यंदा इम्तियाज जलील यांच्याशी लढत; मतविभागणीचा फायदा होणार?

वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलसाठी उपराजधानी सज्ज :१८ जानेवारीला उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 10:24 PM

नागपुरी संत्र्याचे देशभरातच नव्हे तर जगभरात ब्रँडिंग व निर्यात वाढविण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांसाठी चार दिवसीय लोकमतच्या दुसऱ्या जागतिक संत्रा महोत्सवाचे आयोजन १८ ते २१ जानेवारीदरम्यान रेशीमबाग मैदानावर होणार आहे. 

ठळक मुद्देरेशीमबाग मैदानावर कृषी प्रदर्शनसंत्र्यावर जागतिक परिसंवादशेतकऱ्यांना देशविदेशातील तज्ज्ञांतर्फे मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरी संत्र्याचे देशभरातच नव्हे तर जगभरात ब्रँडिंग व निर्यात वाढविण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांसाठी चार दिवसीय लोकमतच्या दुसऱ्या जागतिक संत्रा महोत्सवाचे आयोजन १८ ते २१ जानेवारीदरम्यान रेशीमबाग मैदानावर होणार आहे. 

महोत्सवाचे उद्घाटन १८ जानेवारीला सायंकाळी ५.३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. विशेष अतिथी केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी तर प्रमुख अतिथी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, ऊर्जा, उत्पादन शुल्क व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, सहकार व विपणन मंत्री सुभाष देशमुख, यूपीएलचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक रज्जूभाई श्रॉफ, लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा, खासदार, आमदार आणि अनेक मान्यवर उपस्थित राहतील. यूपीएल लिमिटेड हे महोत्सवाचे मुख्य प्रायोजक आहेत. 
या आंतरराष्ट्रीय महोत्सवात नामांकित घरगुती आणि आंतरराष्ट्रीय कृषी कंपन्यांचे पॅव्हेलियन आणि स्टॉल राहणार आहेत. देशविदेशातील नामांकित कृषितज्ज्ञसंत्र्याच्या प्रजाती, लागवड, उत्पादन, निर्यातीवर मार्गदर्शन करणार आहेत. कृषी प्रदर्शनात संत्र्यावर जागतिक परिसंवाद होणार आहे.देशविदेशातील कृषितज्ज्ञांचा सहभागकृषी प्रदर्शनात देशविदेशातील कृषितज्ज्ञांतर्फे आयोजित परिसंवादात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये ब्राझील, अमेरिका, टर्की, कम्बोडिया, व्हिएतनाम, श्रीलंका, नेपाळ, भूतान आणि दक्षिण कोरिया या देशातील तज्ज्ञांचा समावेश आहे. याशिवाय आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगाणा आणि भारताच्या अन्य राज्यातील तज्ज्ञ प्रदर्शनात सहभागी होणार आहेत.कृषी प्रदर्शनाची उद्दिष्टे 

  •  दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण संत्र्यांचे उत्पादन घेण्यासाठी विदर्भातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन
  •  शेतकरी आणि बाजारपेठेतील गॅप भरून काढण्यासाठी मदत
  •  संत्र्याच्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देऊन परिसंवादाच्या माध्यमातून प्रशिक्षण
  •  संत्रा आणि त्यापासून निर्मित उत्पादनांचा व्यवसाय घरगुती आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये वाढविण्यासाठी मदत
  •  संत्र्यांची निर्यात वाढविण्यावर भर

२० ला कार्निव्हल परेड२० जानेवारीला दुपारी ४ ते ७ पर्यंत कार्निव्हल परेड होणार आहे. यात एपिसेंटर हार्ले-डेव्हिडसन बाईकच्या रायडर्सचा समावेश राहील. परेड वेस्ट हायकोर्ट रोड येथून निघणार आहे.२० ला पतंग महोत्सव२० जानेवारीला रेशीमबाग मैदानावर सकाळी ९ ते सायंकाळी ४ पर्यंत पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात वैदर्भीयांना सहभागी होण्याची संधी आहे.कृषी प्रदर्शनात संत्रा उत्पादनावर मार्गदर्शन

  •  १८ जानेवारीला अर्धदिवसीय परिषद
  •  संत्र्याच्या शेतीसाठी नव्या पिढीला मार्गदर्शन
  •  लिंबूवर्गीय फळांच्या मशागतीसाठी आयसीएआर-सीसीआरआयने विकसित केलेल्या तंत्रज्ञानावर चर्चा आणि माहिती
  •  ‘ऑरेंज फार्मिंग : आव्हाने आणि संधी’ यावर समूह चर्चा
  •  आंतरराष्ट्रीय पातळीवर ऑरेंज फार्मिंगवर सादरीकरण
  •  १८ ते २१ जानेवारीदरम्यान ऑरेंज एक्सपर्ट आणि उत्पादकांतर्फे माहितीपर शैक्षणिक उपक्रम
  •  शेतकऱ्यांशी सुसंवाद
  •  सुरक्षित उत्पादन, पीक विमा, तोडणीनंतरचे पर्याय, संत्र्याची निर्यात, विपणन, तंत्रज्ञानाचा उपयोग, संत्रा फळाचा उपयोग या महत्त्वपूर्ण विषयांवर विस्तृत चर्चा

शेफ संजीव कपूर, गौतम मेहऋषी, विष्णू मनोहर यांची संत्र्यांच्या रेसिपीवर कार्यशाळासुफी गायक कुतले खान येणारदक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात १९ जानेवारीला दुपारी १२ ते ३ पर्यंत नामांकित शेफ विष्णू मनोहर हे सखींना ‘ऑरेंज हलवा’ तयार करण्याच्या रेसिपी सांगणार आहेत. २० जानेवारीला नामांकित शेफ संजीव कपूर दुपारी १२ ते २ पर्यंत सखींसाठी कार्यशाळा आणि संत्र्यापासून विविध पदार्थ तयार करणार आहेत. कार्यशाळा सर्वांसाठी खुली आहे. यावेळी आयोजित स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. २१ जानेवारीला दुपारी १२ ते ३ पर्यंत गौतम मेहऋषी यांचे कुकिंग वर्कशॉप होणार आहे.याशिवाय २० जानेवारीला सिव्हील लाईन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात सायंकाळी ७ वाजता सुफी गायक कुतले खान यांचा संगीतमय कार्यक्रम होणार आहे.शेतकऱ्यांचे उत्पादन वाढणारलोकमतचा ‘वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल’ संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक पर्वणी ठरणार आहे. कंपनीने शेतकऱ्यांसाठी अनेक उत्पादने आणली आहेत. जैन स्वीट ऑरेंज, ठिंबक सिंचन व फर्टिगेशन तंत्रज्ञान असे पॅकेज ऑरेंज उत्पादकांना देत आहोत. त्यामुळे रसाचे प्रमाण, फळात साखरेचे प्रमाण आणि पर्यायाने गुणवत्ता व उत्पादन वाढते. त्यामुळे त्यांचे बाजारपेठेत बाजारमूल्य वाढेल.अतुल जैन, सहव्यवस्थापकीय संचालक,जैन इरिगेशन.

 

टॅग्स :world orange festival Nagpurवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरLokmat Eventलोकमत इव्हेंट