लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. सुभाष देशमुख हे गेल्या ४७ वर्षापासून अमेरिकेला राहतात. परदेशात नोकरी किंवा व्यवसायानिमित्त स्थायिक झाल्यावर लोक आपल्या माणसांना विसरतात. डॉ. देशमुख मात्र त्याला अपवाद ठरले. इतके वर्ष भारताबाहेर राहूनही त्यांनी नागपूर आणि विदर्भाशी नाळ तुटू दिली नाही. विदर्भाच्या मातीवर असलेले त्यांचे प्रेम अतुलनीय आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. डॉ. सुभाष देशमुख मित्र परिवारातर्फे आयोजित डॉ. देशमुख अमृत महोत्सव समारंभात ते बोलत होते. धनवटे सभागृह येथे आयोजित या कार्यक्रमात माजी मंत्री अनिल देशमुख, गिरीश गांधी, उद्योजक सत्यनारायण नुवाल, बाबुराव तिडके, श्रीराम काळे, नाना गावंडे, बाळासाहेब वानखेडे, नीलेश खांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. नितीन गडकरी यांच्याहस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देउन डॉ. देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. संचालन ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी यांनी केले. प्रास्ताविक गिरीश गांधी यांनी केले.
सुभाष देशमुख यांनी विदर्भाशी नाळ तुटू दिली नाही : नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 8:02 PM
डॉ. सुभाष देशमुख हे गेल्या ४७ वर्षापासून अमेरिकेला राहतात. परदेशात नोकरी किंवा व्यवसायानिमित्त स्थायिक झाल्यावर लोक आपल्या माणसांना विसरतात. डॉ. देशमुख मात्र त्याला अपवाद ठरले. इतके वर्ष भारताबाहेर राहूनही त्यांनी नागपूर आणि विदर्भाशी नाळ तुटू दिली नाही. विदर्भाच्या मातीवर असलेले त्यांचे प्रेम अतुलनीय आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
ठळक मुद्देदेशमुख यांचा अमृत महोत्सवी सत्कार