निवृत्ती वेतनधारक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आयकर कायद्याच्या कलम २०८ व २४१ अन्वये ज्यांचा आयकर १० हजार रुपयांपेक्षा जास्त होत असेल त्या कर्मचाऱ्यांचा आयकर सन २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये चार टप्प्यात आगाऊ वसूल करण्याबाबत दिनांक २४ फेब्रुवारी २०२१ नुसार शासनाचे निर्देश आहेत.
१५ जून २०२१ पर्यंतचा कालावधीत वसूल करावयाचा आयकर १५ टक्के, १५ सप्टेंबर २०२१ पर्यंत ४५ टक्के, १५ डिसेंबर २०२१ पर्यंत ७५ टक्के तर १५ मार्च २०२२ पर्यंतच्या कालावधीत १०० टक्के असा आहे.
सन २०२१-२२ करिता सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांनी जुन्या आयकर श्रेणी नियमानुसार मिळणारी वजावट वजा करून व नियम (२) नुसार मिळणारी वजावट वजा न करता नवीन आयकर श्रेणी नियम या दोन पर्यायांपैकी लाभदायक ठरेल, असा पर्याय निवडून वरीलप्रमाणे आयकर वजातीबाबत माहिती कळवावी, असेही स्पष्ट केले आहे.