लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहराच्या हृदयस्थळी असलेल्या हेरिटेज कस्तूरचंद पार्कची सद्यस्थिती दाखविणारी छायाचित्रे रेकॉर्डवर सादर करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिला. याकरिता जिल्हाधिकाऱ्यांना एक आठवड्याचा वेळ देण्यात आला.यासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. त्यावर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. रवी देशपांडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. सध्या कस्तूरचंद पार्कवर विविध विकास कामे सुरू आहेत. त्यामुळे मैदानावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. झाडेझुडपे वाढली आहेत. न्यायालयाने हे मैदान पूर्ववत करण्याचे निर्देश दिले होते. त्याची अंमलबजावणी झाली किंवा नाही हे पाहण्यासाठी छायाचित्रे मागण्यात आली आहेत. दोन महिन्यापूर्वी मैदानावरील स्मारकामध्ये अतिक्रमणही करण्यात आले होते. त्यावरून न्यायालयाने सरकार व मनपाची खरडपट्टी काढल्यानंतर अतिक्रमण तात्काळ हटविण्यात आले. परंतु, मैदानाची परिस्थिती अद्याप सुधारली नाही, असा दावा न्यायालय मित्र अॅड. श्रीरंग भांडारकर यांनी न्यायालयात केला. अॅड. जेमिनी कासट यांनी मनपातर्फे कामकाज पाहिले.
कस्तूरचंद पार्कच्या सद्यस्थितीची छायाचित्रे सादर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 10:56 PM
शहराच्या हृदयस्थळी असलेल्या हेरिटेज कस्तूरचंद पार्कची सद्यस्थिती दाखविणारी छायाचित्रे रेकॉर्डवर सादर करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिला.
ठळक मुद्देहायकोर्टाचा आदेश : जिल्हाधिकाऱ्यांना एक आठवडा वेळ