ठळक मुद्देपाच मिनिटात रद्द होऊ शकते कलम ३७०लोकतंत्र सेनानी मंचतर्फे नागपुरात आणीबाणी स्मृती दिवस
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काश्मीरमध्ये सरकारने कठोर भूमिका घेतली असताना काँग्रेसचे नेते पाकिस्तानी नेत्यांसमोर देशाचे नुकसान करणारे वक्तव्य देत आहेत. अनेक काँग्रेस नेत्यांच्या काळ्या पैशाचे धागे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी जुळले आहेत. त्यांच्या ‘ब्लॅकमेलिंग’मुळे दबावात येऊन अशी वक्तव्ये देण्यात येत आहेत, असा खळबळजनक आरोप भाजप नेते खा.सुब्रमण्यम् स्वामी यांनी केला आहे. नागपुरात लोकतंत्र सेनानी मंचतर्फे आणीबाणी स्मृती दिवसानिमित्त शनिवारी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.चिटणवीस सेंटर येथे झालेल्या या कार्यक्रमाला लोकतंत्र सेनानी मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष कैलाश सोनी व ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणराव जोशी हेदेखील उपस्थित होते. भारतातील काळा पैसा हवालाच्या माध्यमातून दुबईला जातो व तेथून मग ‘स्विस बँक’खात्यात तो जमा होतो. कॉंग्रेसच्या नेत्यांच्या काळ्या पैशांची कामे दाऊदने केली व त्यांची यादीच त्याच्याकडे आहे. कॉंग्रेस नेत्यांची काश्मीरबाबतची अलीकडची वादग्रस्त वक्तव्ये त्याच दबावातून आली आहे, असे सुब्रमण्यम् स्वामी म्हणाले. काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या कलम ३७०ला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विरोध होता. जवाहरलाल नेहरू यांच्या आग्रहापोटी हा दर्जा देण्यात आला. मात्र संविधानात लिहिलेले आहे की हे तात्पुरते कलम आहे व याला रद्द करण्यासाठी संसदेच्या मंजुरीची आवश्यकताच नाही. केवळ राष्ट्रपतींच्या मंजुरीने अधिसूचना काढण्याची आवश्यकता आहे. अवघ्या पाच मिनिटांत हे कलम हटू शकत असताना इतके वर्ष का प्रतीक्षा करण्यात आली व सध्याचे सरकारदेखील पाच वर्षे पूर्ण होण्याची वाट पाहत आहे का असा प्रश्न स्वामी यांनी उपस्थित केला. दीप्ती कुशवाह यांनी कार्यक्रमाचे संचालन केले तर रवींद्र कासखेडीकर यांनी आभार मानले.राममंदिरासाठी अध्यादेश येऊ शकतोराममंदिराचा मुद्दा न्यायालयात असला तरी केंद्र सरकार यासंदर्भात कायदा करण्यासाठी संसदेत विशेष प्रस्ताव आणण्याची शक्यता आहे. एक अध्यादेश जारी करण्यात येईल व निवडणुकांच्या अगोदर राममंदिराचा मार्ग मोकळा करण्यात येईल, असा सुब्रमण्यम् स्वामी यांनी दावा केला. जर वादग्रस्त जागेवर मंदिर असल्याचे पुरावे मिळाले तर जागा मंदिरासाठी देण्यात येईल, असे डॉ.पी.व्ही.नरसिंहराव पंतप्रधान असताना सरकारने शपथपत्रात म्हटले होते. तसे पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे सरकारला यात फारशी अडचण जाणार नाही, असेदेखील ते म्हणाले.नेहरूंमुळे आंबेडकर, पटेलांवर अन्यायडॉ.बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल यांंची संविधान व देशनिर्मितीत मौलिक भूमिका होती. मात्र नेहरू यांनी त्यांच्या कार्यकाळात या तिघांनाही भारतरत्न मिळू दिले नाही. पहिले भारतरत्न नेहरू यांनाच मिळाले व त्यावर सहीदेखील स्वत: नेहरू यांचीच होती, असे सुब्रमण्यम् स्वामी यांनी सांगितले.देशात थेट आणीबाणी लागणार नाहीइंदिरा गांधी यांनी लावलेल्या आणीबाणीनंतर पुढील सरकारने संविधानात संशोधन केले. यानुसार थेट आणीबाणी लावणे शक्य नाही. केवळ देशात सशस्त्र विद्रोह झाला तर आणीबाणी लागू शकते. लोकशाही देशाच्या रक्तातच आहे. त्यामुळे जुनी आणीबाणी लागूच शकत नाही. आणीबाणीच्या अफवा खूप उठतात.मात्र देशातील भ्रष्टाचार हे त्याहून मोठे आव्हान आहे, असे प्रतिपादन स्वामी यांनी केले.विकासाने निवडणुका जिंकल्या जात नाहीदेशात आर्थिक विकासातूनच निवडणुका जिंकल्या जाऊ शकत नाहीत तर लोकांच्या भावना हादेखील एक मोठा मुद्दा असतो. त्यामुळे पुढील निवडणुकांत भ्रष्टाचार, हिंदुत्व व विकास या त्रिसूत्रीच्या आधारावर भाजप लढेल असेदेखील स्वामी यांनी यावेळी सांगितले.