जनजीवन प्रभावित : कूलर, एसीच्या मागणीत वाढनागपूर : मागील तीन दिवसांपासून सूर्य उपराजधानीसह संपूर्ण विदर्भात आग ओकू लागला आहे. यातच शनिवारी नागपुरातील तापमान ४२ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. शिवाय चंद्रपूर ४२.२ अंश सेल्सिअससह सर्वांधिक तापले आहे. तसेच नागपूर ४२ अंशासह दुसऱ्या स्थानावर राहिले आहे. यामध्ये वाशिम येथे ३७.६ अंशासह सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली आहे. या वाढत्या तापमानाने संपूर्ण जनजीवन प्रभावित झाले आहे. कमाल व किमान तापमानात २० अंशापेक्षा अधिकची तफावत आहे, यामुळे वातावरणात रात्री थंडी व दिवसा उकाडा असा विरोधाभास जाणवतो. उकाडा वाढल्याने घरोघरी आणि कार्यालयांमध्ये कुलर व एसी सुरू झाले आहेत. यामुळे नवीन कूलर आणि एसीच्या मागणीतही प्रचंड वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, मार्च महिना हा विदर्भासाठी हवामान बदलाचा असतो. त्यामुळे याच महिन्यापासून उन तापायला सुरुवात होते. या महिन्यात पारा हा ३८ ते ४० अंशादरम्यान असतो. मात्र यंदा तो ४२ अंशावर पोहोचला आहे. मागील तीन दिवसांपासून चांगलेच ऊन तापू लागले. याच आठवड्याच्या सुरुवातीला पारा हा ३५ अंशापर्यंत होता. मात्र त्यानंतर तो ४० अंशावर पोहोचून आता थेट ४२ अंशाचा टप्पा गाठला आहे.(प्रतिनिधी)विदर्भातील तापमान शहरअधिकतमनागपूर ४२.००अकोला४१.०२बुलडाणा३८.०७वर्धा४२.००चंद्रपूर४२.०२अमरावती४१.०२गोंदिया४१.०२यवतमाळ४०.००
उपराजधानीत पारा ४२वर
By admin | Published: March 26, 2017 1:33 AM