दोन दिवसांत गरमी वाढणार : कमाल तापमान ३४.६ अंशावर नागपूर : फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच दिवशी उपराजधानीत पारा ३४.६ अंश सेल्सिअसपर्यंत वर चढला आहे. थंडीचा जोर अचानक कमी होऊ न रात्रीचे तापमान सामान्य झाले आहे. मात्र त्याच वेळी उत्तर भारतातील वातावरणात सतत बदल होत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम उपराजधानीतील वातावरणावर होऊ शकतो, अशीही शक्यता वर्तविली जात आहे. सोमवारी नागपुरातील सरासरी तापमान सामान्यापेक्षा ४ अंशानी अधिक म्हणजे ३४.६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. तसेच किमान तापमान १५.३ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली. याशिवाय वाशीम येथे किमान तापमान १९.४ अंशावर पोहोचले असून, ते विदर्भात सर्वाधिक असल्याचे बोलले जात आहे. चंद्रपूर व गोंदिया येथे कमाल ३६.२ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. हवामान खात्याच्या मते, पुढील दोन दिवस विदर्भात दिवसा गरमी आणि रात्री सामान्य तापमान राहील. साधारण फेब्रुवारी महिन्यात किमान तापमान १४ अंशावरून १७ अंशापर्यंत चढत असते. परंतु अनेकदा उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे तापमान खाली घसरते. (प्रतिनिधी)६५ वर्षांपूर्वीचा विक्रम ४उपलब्ध आकडेवारीनुसार मागील १० वर्षांपूर्वी २४ फेब्रुवारी २००६ रोजी सर्वाधिक ३९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तो फेब्रुवारी महिन्यातील सर्वात गरम दिवस राहिला आहे. त्याशिवाय २८ फेब्रुवारी २००९ रोजी कमाल ३९ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. यावरून फेब्रुवारी महिन्यापासून गरमीला सुरुवात होत असल्याचे दिसून येते. दुसरीकडे १२ फेबु्रवारी १९५० रोजी शहरातील किमान तापमान ५ अंशापर्यंत खाली घसरल्याचीसुद्धा नोंद असून, तो वेगळा विक्रम बनला आहे.
उपराजधानीतील पारा चढला
By admin | Published: February 02, 2016 2:54 AM