लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उत्तर प्रदेशच्या हाथरस येथे घटलेल्या घटनेच्या विरोधात सुदर्शन वाल्मीकी मखीयार समाज समन्वय समितीच्या वतीने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून निषेध सभा आणि कॅँ डल मार्चचे आयोजन केले. संविधान चौक येथे शुक्रवारी कॅँ डल मार्चसह निषेध सभा घेण्यात आली. यावेळी विदर्भ महादलित परिसंघाचे प्रवक्ते हरीश नक्के यांनी देशातील दलित अत्याचाराच्या घटनांचे सविस्तर विवरण दिले. यावेळी बाबूराव वामन, अ. भा. सफाई मजदूर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयसिंह कछवाहा, परिसंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष उमेश पिंपरे, कॉर्पोरेशन एम्प्लाईज असोसिएशनचे माजी कार्याध्यक्ष राजेश हाथीबेड, प्रकाश चमके, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास केंद्राचे अध्यक्ष सुनील तुरकेल, राष्ट्रीय मूलनिवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुकेश चंडालिया, मखीयार समाज समितीचे अध्यक्ष संजय शेंडे, सुनील जाधव आदी प्रामुख्याने उपस्थित होते. तरुणीवर अमानुषपणे अत्याचार करून मृत्यूस जबाबदार असलेल्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यासह पीडित कुटुंबावर अन्याय करणाऱ्या उत्तर प्रदेश सरकारला बरखास्त करण्याची मागणी आंदोलनादरम्यान करण्यात आली. प्रा. किशोर बिरला, प्रा. राहुल मून, मनीष बागडे, राजकुमार खरे, अक्षय वाल्मीकी, विशाल चोटेल, हरिदास व्यास, अजय करोसिया, पारस रगडे, मनजित चौहान, रिंकू चौहान, कुणाल पारोचे, मनीष दुबे, अमित चिमोटे, मालती बिरला, माया उके, सुनंदा देशपांडे, विमल मेश्राम, रेखा डोंगरे, प्रतिभा गडपायले, खेमन सहारे आदींचा सहभाग होता.
सुदर्शन वाल्मीकी समाजातर्फे हाथरस घटनेचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2020 1:24 AM