लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाकवी सुधाकर गायधनी यांना जळगाव येथील सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाने अखील भारतीय दलुभाऊ जैन मराठी साहित्यभूषण पुरस्कार जाहीर केला आहे. जळगाव येथे १८ ऑगस्टला होणाऱ्या एकदिवसीय राज्यस्तरीय पंधराव्या सूर्योदय मराठी साहित्य संमेलनात त्यांचा या पुरस्काराने गौरव केला जाणार आहे.या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ८८ व्या अखील भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सदानंद मोरे राहतील. २१ हजार रुपयांचा धनादेश आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रा. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, प्रदीप निफाडकर, अरूणा सबाने, माया धुप्पड, अशोक सोनवणे, एकनाथ आव्हाड, चंद्रकांत चव्हाण, विजय पाठक, विजय मोहरीर या सदस्यांचा समावेश असलेल्या निवड समितीने साहित्य सेवेतील योगदानाबद्दल त्यांची निवड केली आहे. युनेस्को मान्यताप्राप्त ३७ व्या विश्वकवी परिषदेच्यावतीने २०१७ मध्ये मंगोलियामध्ये जगातील सात कविंची डिलिटसाठी निवड झाली होती. त्यात सुधाकर गायधनी भारतातील एकमेव होते, हे विशेष !साधना दखलपात्र होत असल्याचा आनंद : गायधनीया निवडीबद्दल प्रतिक्रिया देताना सुधार गायधनी म्हणाले, गेली पन्नास वर्षे मी लिहितो आहे. आपण जे करतो त्याचा परतावा साहित्यप्रेमींकडून पुरस्काराच्या रुपाने मिळत असल्याचा आणि आपली साधना दखलपात्र होत असल्याचा आनंद आहे. निवड समितीमध्ये नामवंत आहेत. त्यांच्या निवडीचा मी सन्मान करतो. हा नववा पुरस्कार आहे.
सुधाकर गायधनी यांना ‘मराठी साहित्यभूषण’ पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2019 8:59 PM