शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

अंबाझरीत दोघांना जबर मारहाण

By admin | Published: February 21, 2017 10:04 PM

विरोधी गटातील कार्यकर्त्यांवर हल्ला चढवून दोघांना बेदम मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आल्याची घटना मंगळवारी सायंकाळी रामनगर परिसरात घडली.

 नागपूर : विरोधी गटातील कार्यकर्त्यांवर हल्ला चढवून दोघांना बेदम मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आल्याची घटना मंगळवारी सायंकाळी रामनगर परिसरात घडली. यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. वेळीच पोलीस पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, मारहाणीत जखमी झालेल्या घनश्याम चौधरी यांनी आमदार परिणय फुके, भाजपाचे प्रभाग १३ चे उमेदवार अमर बागडे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप लावला. आमदार फुकेंनी मात्र हल्ल्याचा इन्कार केला आहे. मंगळवारी उपराजधानीत महापालिकेची निवडणूक पार पडली.

जागोजागी गोंधळ, आपसातील वाद अन् बाचाबाचीच्याही घटना घडल्या. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून प्रकरण निवळले. मतदानाची वेळ संपल्यानंतर विविध राजकीय पक्षाचे नेते-कार्यकर्ते आपापल्या कार्यालयात निघाले. रामनगर, हिलटॉप परिसरात भाजपाचे शहर उपाध्यक्ष घनश्याम चौधरी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भाऊ वाघाडे वॅगनआर कारमधून रामनगरातील वर्मा लेआऊटमधून जात होते. वेगवेगळ्या वाहनांनी पाठलाग करीत आलेल्या आठ ते दहा जणांनी विघ्नहर्ता मंगल कार्यालयाजवळ त्यांना रोखले. कारमधून बाहेर खेचून चौधरी आणि वाघाडेंना हल्लेखोरांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

कारचीही तोडफोड केली. शिवीगाळ आरडाओरड आणि गोंधळामुळे या भागात मोठी गर्दी जमली. काही अंतरावरच बंदोबस्तावरील पोलीस ताफा होता. त्यांनी धाव घेऊन चौधरी आणि वाघाडे यांना हल्लेखोरांच्या तावडीतून सोडवले. हल्लेखोर ऐकत नसल्याचे पाहून पोलिसांनी बळाचा वापर केला. गंभीर अवस्थेतील चौधरी तसेच वाघाडेंना त्यांच्या सहकाऱ्यांनी रविनगर चौकातील दंदे हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. चौधरींची प्रकृती लक्षात घेता त्यांना लगेच अतिदक्षता कक्षात नेण्यात आले.

दरम्यान, या मारहाणीच्या घटनेची माहिती कळताच भाजपा तसेच शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येत दंदे हॉस्पिटलसमोर पोहोचले. तेथे मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू झाल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला. माहिती कळताच पोलीस उपायुक्त राकेश कलासागर, अंबाझरीचे ठाणेदार अतुल सबनीस यांच्यासह मोठा पोलीस ताफा पोहोचला. त्यांनी जमावाला शांत केले. त्यानंतर डॉ. पिनाक दंदे यांच्याशी चर्चा करून जखमी चौधरी यांना घटनेबाबत माहिती विचारली. चौधरी यांनी आपल्याला आ. फुके, अमर बागडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण केल्याचा तक्रारवजा आरोप पोलीस आयुक्त कलासागर यांच्याशी बोलताना लावला. दरम्यान, जखमींवर अतिदक्षता कक्षात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉ. दंदे यांनी लोकमतशी बोलताना दिली. ---

आपला संबंध नाही : आ. फुके यासंबंधाने दुसरी बाजू जाणून घेण्यासाठी प्रस्तुत प्रतिनिधीने त्यांच्याशी संपर्क साधला असता आ. फुके यांनी हल्ल्याचा इन्कार केला. ते म्हणाले, भांडण सुरू असल्याचे आपल्याला कळले. त्यामुळे आपण तेथे गेलो. चौधरींना मारहाण होत असल्याचे पाहून आपण त्यांना वाचविण्यासाठी धावलो. त्यावेळी तेथे काहींनी दगडफेक केली. एक दगड आपल्याला लागल्याने आपण तेथून घरी आलो. नियंत्रण कक्षात १०० क्रमांकावर फोन करून त्याची माहिती दिली. दरम्यान, अमर बागडे आमच्या पक्षाचे उमेदवार आहेत. त्यांना चौधरींनी जातीवाचक शिवीगाळ केल्यामुळे आपण बागडेंसोबत अंबाझरी ठाण्यात तक्रार द्यायला आलो आहे. चौधरींना ते कळले म्हणून त्यांनी आपले नाव या हल्ल्यात घेतले असावे, असेही आ. फुके म्हणाले.

गंभीरपणे चौकशी : उपायुक्त कलासागर दरम्यान, पोलीस या प्रकरणाची गंभीरपणे चौकशी करीत आहे. वैद्यकीय अहवालाची गंभीरपणे चौकशी करीत असून, प्रत्यक्षदर्शींचे बयान तसेच वैद्यकीय अहवालानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त कलासागर यांनी लोकमत प्रतिनिधींशी बोलताना दिली.