हिंगणा/गुमगाव : कंपनीत काम करणाऱ्या कामगाराने घरी कुणीही नसताना गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना हिंगणा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील वागदारा (नवीन गुमगाव) येथे साेमवारी (दि. १६) दुपारी घडली.
विनोद सुखदेव कांबळे (४२) असे मृताचे नाव आहे. ताे मूळचा भडांगा, ता. कळमेश्वर येथील रहिवासी असून, गौतम पाटील, रा. वागदरा, ता. हिंगणा यांच्या घरी कुटुंबासह किरायाने राहायचा व परिसरातील कंपनीमध्ये कामगार म्हणून काम करायचा. साेमवारी दुपारी पत्नी शीला मुलींना घेऊन शेजारी गेली हाेती. त्यामुळे घरी कुणीही नसल्याचे पाहून त्याने खाेलीत छताला गळफास लावून आत्महत्या केली. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास पत्नी घरी परत आल्यावर तिला विनाेद लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिंगणा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. याप्रकरणी हिंगणा पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, पुढील तपास पाेलीस हवालदार सिद्धार्थ तामगाडगे करीत आहेत.