मृतक तरुण अंदाजे ३० वर्षे वयाचा आहे. बेसा माजामा घातलेल्यार्गावरील व्यंकटेश सिटी नंबर २ परिसरात तो दिवसभर वेडसर सारखा फिरायचा. मंगळवारी दुपारी बाजूच्या एका इमारतीजवळ तो बराच वेळ केवळ पायजामा घातलेल्या अवस्थेत घुटमळत होता. त्याने बाजूलाच वाळत घातलेल्या कपड्यातील एक टी शर्ट ओढला. ते पाहून तेथील एक मुलगा ‘माझा टी शर्ट ... माझा टी शर्ट...’ म्हणून ओरडला. त्यामुळे हा तरुण घाबरला. त्याने हातचे टी शर्ट फेकून दिले. काटेरी झुडूपातून तो व्यंकटेश सिटीच्या आतमध्ये धावत गेला आणि चवथ्या माळ्यावरून त्याने खाली उडी घेतली. अनेकांनी त्याला इमारतीवरून उडी घेताना बघितले. तो रक्ताच्या थारोळ्यात खाली पडल्याचे पाहून एकाने हुडकेश्वर पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत तरुणाच्या शरीरावर पायजामा होता. त्यात कोणतीही वस्तू अथवा पैसे किंवा ओळख पटविणारा कोणताही कागद नव्हता. पोलिसांनी त्याची ओळख पटविण्यासाठी आजूबाजूच्यांना विचारणा केली. मात्र, कुणीही त्याच्याबाबत माहिती देऊ शकले नाही.
---
आधी गळा कापून घेतला
इमारतीवरून उडी घेण्यापूर्वी त्या तरुणाने टिनाच्या पत्र्याने आपला गळा कापून घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या गळ्यावर तसा घाव दिसून येत असल्याचे हुडकेश्वरचे ठाणेदार प्रताप भोसले यांनी सांगितले. त्याची ओळख पटविण्यासाठी पोलीस प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले.
----