शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

नागपुरात शवविच्छेदनगृहाच्या इमारतीत आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 1:00 AM

गेल्या २४ तासात एका महिलेसह ६ जणांनी गळफास लावून आत्महत्या केली. या घटना हुडकेश्वर, पारडी, यशोधरानगर, हिंगणा, अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या.

ठळक मुद्दे२४ तासात ६ जणांनी लावला गळफासएका महिलेसह ६ जणांचा समावेश हुडकेश्वर, पारडी, यशोधरानगर, हिंगणा, अजनी ठाण्याच्या हद्दीतील घटना

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : गेल्या २४ तासात एका महिलेसह ६ जणांनी गळफास लावून आत्महत्या केली. या घटना हुडकेश्वर, पारडी, यशोधरानगर, हिंगणा, अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या.पहिली घटना हुडकेश्वर हद्दीत घडली. जानकीनगर येथील अस्मिता पंकज भरजे (२६) यांनी मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास सिलिंग फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास लावला. दुसरी घटना पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हनुमाननगर भांडेवाडी येथे घडली. येथे राहणारा सुदेश दुर्गाप्रसाद खोब्रागडे (२९) याने राहत्या घरी सिलिंग फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास लावला. तिसरी घटना यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंचवटीनगर येथे घडली. येथील संजय सदाशिव वासनिक (५०) यांनी गळफास लावूून आत्महत्या केली. हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांडव घोराड येथील रहिवासी तुळशीदास शालिकराव उकीनकर (३०) यांनी आपल्या राहत्या घरी सिलिंग फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. तालुक्यातील मेटाउमरी खदान येथील वासू गुरू नैताम (४४) यांनी घराच्या बाहेरील झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. या दोन्ही घटना बुधवारी सकाळी उजेडात आल्या. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.मेडिकलच्या शवविच्छेदन गृहाच्या नवीन इमारतीत आत्महत्याअजनी पोलीस स्टेशन हद्दीतील मेडिकल हॉस्पिटलच्या शवविच्छेदनगृहाच्या नवीन इमारतीच्या लोखंडी ग्रीलला दुपट्ट्याच्या साहाय्याने गळफास लावून ३५ वर्ष वयोगटातील एका इसमाने आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास उजेडात आली.विषारी औषध पिऊन आत्महत्याइमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामबाग, मोठ्या विहिरीजवळ राहणारे शंकर रामभाऊ परचाके (४८) यांनी विषारी औषध प्राशन केल्याने त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाली. त्यांना उपचारासाठी मेडिकलमध्ये भरती केले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

टॅग्स :Suicideआत्महत्याnagpurनागपूर