नागपूर : आर्थिक कोंडीमुळे एका व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केली. धीरज श्रावणजी खंडारे (वय ३८) असे मृताचे नाव आहे.
धीरज कपिलनगर पोलिसांच्या हद्दीतील सुयोगनगरात राहत होते. त्यांनी रविवारी रात्री ८.४५ च्या सुमारास गळफास लावून घेतला. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता धीरजने आर्थिक कोंडीमुळे आत्महत्या केल्याचे उघड झाले.
---
शस्त्राच्या धाकावर दहशत
निर्माण करणारा गुंड जेरबंद
नागपूर : शस्त्राच्या धाकावर परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या गुंडाला शांतीनगर पोलिसांनी अटक केली. शुभम संजय झोडे (वय २५) असे या गुंडाचे नाव असून तो लालगंज झाडे चौकात राहतो. सोमवारी रात्री ७ च्या सुमारास तो झाडे चौकात शस्त्राच्या धाकावर दहशत निर्माण करून येणाऱ्या जाणाऱ्यांना शिवीगाळ करत असल्याचे पोलिसांना कळविले. त्यावरुन शांतीनगरचे उपनिरीक्षक अरुण बकाल यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी जोडीला पकडले. त्याच्या ताब्यातून चाकू जप्त करण्यात आला.
---
दोन अल्पवयीन मुली बेपत्ता
नागपूर : पाचपावली परिसरात राहणारी १३ वर्षीय मुलगी सोमवारी सकाळपासून बेपत्ता झाली. तर एमआयडीसी पोलिसांच्या हद्दीतील सतरा वर्षीय मुलगी रविवारी दुपारी ३ वाजता पासून बेपत्ता आहे. त्यांना फूस लावून पळवून नेले असावे, असा संशय आहे. पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार पाचपावली आणि एमआयडीसी पोलिसांनी वेगवेगळी गुन्ह्यांची नोंद केली. बेपत्ता मुलींचा शोध घेतला जात आहे.
---