जलालखेडा : तरुणाने घरी कुणीही नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना जलालखेडा (ता. नरखेड) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील जामगाव येथे गुरुवारी (दि. २६) रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.
विकास बाबाराव सातमोहणकर (२९, रा. जामगाव, ता. नरखेड) असे मृताचे नाव आहे. ताे कळमेश्वर येथील कंपनीत नाेकरीत हाेता. रक्षाबंधननिमित्त मंगळवारी (दि. २४) गावाला आला हाेता. त्याला दारूचे व्यसन असल्याने पाेटाचा आजारही जडला हाेता. दारू प्यायल्यानंतर ताे आई-वडिलांना त्रास द्यायचा. त्यामुळे त्याने दारू पिणे साेडावे, यासाठी कुटुंबीय प्रयत्नरत हाेते. त्याच्या त्रासामुळे कुटुंबीय गुरुवारी (दि. २६) सायंकाळी घराबाहेर गेले हाेते. त्यामुळे घरी कुणीही नसल्याचे पाहून त्याने खाेलीत गळफास घेतला. रात्री ८ वाजताच्या सुमारास आई-वडील घरी परतल्यावर त्यांना विकास लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जलालखेडा येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात आणला. याप्रकरणी जलालखेडा पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, तपास बिट जमादार प्रज्याेक तायडे करीत आहेत.
270821\img_20210827_183211.jpg
फोटो ओळी. मृत विकास सातमोहनकर.