वाडी : प्रेयसीने प्रतिसाद न दिल्याने रागाच्या भरात राहत्या घरात गळफास लावून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना वाडी शहरातील डाॅ. आंबेडकरनगर येथे साेमवारी (दि. २६) सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
अनुप संजय वानखेडे (१९, रा. रमाबाई चाैक, डाॅ. आंबेडकरनगर, वाडी) असे मृत तरुणाचे नाव असून, ताे वाडीतील एका गाेडाऊनमध्ये कामाला हाेता. वर्षभरापूर्वी त्याची पूजा (बदललेले नाव) हिच्याशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. दाेघांचे एकमेकांशी माेबाइलवर सतत बाेलणे, व्हाॅट्सॲपवर संपर्कात हाेते. दरम्यान, काेणत्यातरी कारणावरून दाेघांमध्ये खटके उडू लागल्याने प्रेयसीने प्रतिसाद देणे थांबविले. ही बाब मनाला लावून घेत, अनुपने घटनेच्या आदल्या दिवशी पूजाला व्हिडिओ काॅल करून स्वत:चे डाेके फाेडण्याचा प्रयत्न केल्याची बाब समाेर आली. त्यानंतरही तिने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे रागाच्या भरात राहत्या घरी वरच्या माळ्यावर सिलिंग पंख्याला दाेरीच्या साहाय्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली. काही वेळाने ही बाब त्याच्या मित्राच्या लक्षात येताच, त्यांनी अनुपच्या कुटुंबीयांना माहिती दिली. कुटुंबीयांनी त्याला खाली उतरवून खासगी दवाखान्यात नेले असता, डाॅक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घाेषित केले. घटनेची माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेयाे हाॅस्पिटलमध्ये पाठविला. या प्रकरणी वाडी पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, तपास सुरू केला आहे.