शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
3
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
4
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
5
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
6
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
7
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
8
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
9
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
10
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
11
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

नागपुरातील  खामल्यात व्यापाऱ्याची दुकानात आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 11:44 PM

खामल्यातील एका रेडिमेड कापड विक्रेत्याने दुकान बंद करून आतमध्ये गळफास लावून घेतला. सुधीरकुमार दयाराम बत्रा (वय ४६) असे आत्महत्या करणाऱ्या व्यापाऱ्याचे नाव आहे. कर्जबाजारीपणामुळे झालेल्या आर्थिक कोंडीतून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी बत्रा यांनी हे आत्मघाती कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.

ठळक मुद्देशटर बंद करून लावला गळफास : तीन दिवसानंतर उघडकीस आली घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खामल्यातील एका रेडिमेड कापड विक्रेत्याने दुकान बंद करून आतमध्ये गळफास लावून घेतला. सुधीरकुमार दयाराम बत्रा (वय ४६) असे आत्महत्या करणाऱ्या व्यापाऱ्याचे नाव आहे. कर्जबाजारीपणामुळे झालेल्या आर्थिक कोंडीतून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी बत्रा यांनी हे आत्मघाती कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.मूळचे जळगाव येथील रहिवासी असलेले बत्रा काही वर्षांपूर्वी नागपुरात आले होते. त्यांनी जुनी वस्तीत घर घेतले तसेच खामल्यातील शंकर लालवानी यांच्याकडे भाड्याने दुकान घेऊन तेथे मुस्कान कलेक्शन नावाने रेडिमेड कपड्याचे दुकान थाटले. व्यापाºयांचे जुने कर्ज बाकी असताना नवीन दुकानाला पाहिजे तसा प्रतिसाद न मिळाल्याने त्यांच्यावरचे कर्ज वाढतच गेले. त्यांनी घर विकून कर्जाच्या कोंडीतून निघण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्यातही त्यांना यश मिळाले नाही. ते ममता सोसायटीत भाड्याच्या घरात राहत होते. कर्जदारांचा सारखा तगादा सुरू झाल्याने ते कंटाळले होते. कर्जाच्या कोंडीतून सुटका होण्याचे संकेत न मिळाल्याने अखेर त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला. शनिवारी सकाळी ते दुकानात जातो म्हणून घरून निघाले. सोमवारी दुपारी त्यांच्या दुकानाच्या बंद शटरमधून तीव्र दुर्गंधी येऊ लागली. त्यामुळे आजूबाजूच्यांनी प्रतापनगर पोलिसांना कळविले. पोलिसांनी दुकानाचे शटर उघडले असता आतमध्ये बत्रा यांचा गळफास लावलेला मृतदेह पोलिसांना आढळला. काजल सुधीरकुमार बत्रा (वय ४४) यांच्या सूचनेवरून प्रतापनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.सुसाईड नोट जप्तपोलिसांनी बत्रा यांच्या दुकानातून एक सुसाईड नोट जप्त केल्याचे समजते. या नोटमध्ये नेमके काय लिहून आहे, ते पोलिसांकडून स्पष्ट झाले नाही. दरम्यान, गळफास लावण्यापूर्वी बत्रा यांनी विषही पिल्याचा संशय आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Suicideआत्महत्याnagpurनागपूर