लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोरेवाडा वन्य प्राणी बचाव केंद्रातील ‘सुलतान’ नावाच्या वाघाची मंगळवारी मुंबईतील बोरिवली राष्ट्रीय उद्यानात रवानगी होत आहे. या उद्यानात बिजली, मस्तानी आणि लक्ष्मी नावाच्या आठ ते दहा वर्षांच्या तीन वाघिणी आहेत. त्यांच्यासाठी प्रजननक्षम वाघाचा शोध या उद्यानाच्या व्यवस्थापनाला होता. मागील वर्षभरापासून यासाठी पत्रव्यवहार सुरू होता. त्यानुसार कायदेशिर तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्याने मंगळवारी हा सुलतान नावाचा वाघ तिकडे पाठविला जाणार आहे.बोरिवली राष्ट्रीय उद्यानाच्या प्रशासनाला गोरेवाडा येथील रेस्क्यू सेंटरमध्ये ब्रम्हपुरी येथून पकडून आणलेला ‘सुलतान’ नावाचा वाघ असल्याची आणि एक कमी वयाचा वाघ असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे बोरीवली प्रशासनाने ब्रीडिंग कार्यासाठी हा वाघ मिळावा अशी विनंती गोरेवाडा वन्य प्राणी बचाव केंद्राकडे केली होती. वन विकास महामंडळा अंतर्गत येणाऱ्या गोरेवाडा अंतर राज्यीय प्राणीसंग्रहालय प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव वरिष्ठांच्या मंजुरीसाठी पाठविला होता. यानंतर एफडीसीएमच्या अधिकाऱ्यांनी ब्रीडिंग कार्याच्या दृष्टीने आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून ‘सुलतान’ला बोरीवलीमध्ये पाठविण्यासाठी मंजुरी दिली.बोरिवली येथून से रविवारी आरएफओ विजय बारब्दे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेष पेठे, वैभव पाटील, संजय गायकवाड आदींचे पथक सर्वसुविधायुक्त अँबुलन्स घेऊन नागपूरकडे निघाले आहेत. सुलतानच्या वैद्यकीय तपासणीनंतर त्याला मंगळवारी बोरिवली पथकाकडे सोपविले जाईल.काळे म्हणाले, ‘त्यांनाच विचारा !’गोरेवाडाचे विभागीय व्यवस्थापक (डीएफओ) नंदकिशोर काळे यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला असता, ‘त्यांनाच विचारा. मी काही सांगू शकत नाही.’ असे त्रोटक उत्तर देऊन फोन बंद केला. यामुळे यात लपविण्यासारखे आहे तरी काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.बोरिवली राष्ट्रीय उद्यानाच्या व्यवस्थापनाकडून ब्रीडिंग कार्यासाठी या वाघाची मागणी झाली होती. तशी कायदेशिर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानुसार हा वाघ त्यांना सोपविला जात आहे.डॉ. एन. रामबाबूप्रभारी वन बल प्रमुख तथा व्यवस्थापकीय संचालक, वन विकास महामंडळ
गोरेवाड्यातील 'सुलतान'ची मंगळवारी बोरिवली पार्कमध्ये रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 11:42 PM
गोरेवाडा वन्य प्राणी बचाव केंद्रातील ‘सुलतान’ नावाच्या वाघाची मंगळवारी मुंबईतील बोरिवली राष्ट्रीय उद्यानात रवानगी होत आहे. या उद्यानात बिजली, मस्तानी आणि लक्ष्मी नावाच्या आठ ते दहा वर्षांच्या तीन वाघिणी आहेत. त्यांच्यासाठी प्रजननक्षम वाघाचा शोध या उद्यानाच्या व्यवस्थापनाला होता.
ठळक मुद्देप्रजनन कार्यासाठी मागणी : वर्षभरापासून सुरू होता पत्रव्यवहार