लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बडतर्फ सहायक संचालक रवींद्र दुरुगकर यांच्या प्रकरणामध्ये शुक्रवारी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालकांना समन्स बजावला व त्यांना येत्या २८ जून रोजी न्यायालयात व्यक्तिश: उपस्थित होऊन स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश दिला.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राला २४ एप्रिल २०१७ रोजी नोटीस बजावून चार आठवड्यात उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला होता. परंतु, केंद्राने अद्याप उत्तर दाखल केले नाही. त्यामुळे न्यायालयाने संचालकांना समन्स बजावला. दुरुगकर यांना १० डिसेंबर २०१३ रोजी बडतर्फ करण्यात आले आहे. त्या आदेशाविरुद्ध त्यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. सुनावणीची संधी न देता हा आदेश जारी करण्यात आला. आदेश अवैध आहे. त्यामुळे तो आदेश रद्द करण्यात यावा असे दुरुगकर यांचे म्हणणे आहे.दुरुगकर यांना २४ डिसेंबर २०१२ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यावर त्यांनी ३१ डिसेंबर २०१२ रोजी उत्तर दाखल केले होते. त्यानंतर त्यांच्यावर ११ डिसेंबर २०१३ रोजी दोष निश्चित करण्यात आले. त्याविरुद्ध कार्यकारी मंडळाचे अध्यक्षांकडे अपील करूनही काहीच फायदा झाला नाही. चौकशी अधिकाऱ्याने त्यांना सुनावणीची संधी न देता १३ नोव्हेंबर २०१३ रोजी अहवाल सादर केला. त्या आधारावर त्यांना बडतर्फ करण्यात आले असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. श्रीरंग भांडारकर यांनी बाजू मांडली.
दमक्षे सांस्कृतिक केंद्र संचालकांना समन्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 1:24 AM
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बडतर्फ सहायक संचालक रवींद्र दुरुगकर यांच्या प्रकरणामध्ये शुक्रवारी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालकांना समन्स बजावला व त्यांना येत्या २८ जून रोजी न्यायालयात व्यक्तिश: उपस्थित होऊन स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश दिला.
ठळक मुद्देहायकोर्ट : २८ जून रोजी हजर होण्याचा आदेश