शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

एव्हरेस्टवरून सूर्योदयाचे दृश्य विसरणार नाही : प्रणवने मांडला ३५ दिवसांचा भावनिक प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 11:41 PM

एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न प्रत्येक गिर्यारोहकाचे असते, तसे ते बालपणापासून माझाही पिच्छा सोडत नव्हते. २०१६ ला अपयशी झालो आणि हे स्वप्न अधिकच बळावले. तीन वर्षाच्या तयारीनंतर २०१९ हे वर्ष माझे ठरले. २३ मेचा अंतिम दिवस असताना आम्ही २० मेच्या पहाटे ७.३० वाजता एव्हरेस्टवर पोहचलो. त्या अत्युच्च शिखरावरून पाहताना केशरी रंग चढविलेला सूर्य हळूहळू वर येत होता. एव्हरेस्ट सर करण्यासह त्या टोकावरून सूर्योदय पाहण्याचे स्वप्नही पूर्ण झाले. हे दृश्य मी आयुष्यात कधीही विसरणार नाही, असे भावनिक मनोगत विदर्भाचा एव्हरेस्टवीर प्रणव बांडबुचे याने व्यक्त केले.

ठळक मुद्देएव्हरेस्टवीराचा हृद्य सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न प्रत्येक गिर्यारोहकाचे असते, तसे ते बालपणापासून माझाही पिच्छा सोडत नव्हते. २०१६ ला अपयशी झालो आणि हे स्वप्न अधिकच बळावले. तीन वर्षाच्या तयारीनंतर २०१९ हे वर्ष माझे ठरले. २३ मेचा अंतिम दिवस असताना आम्ही २० मेच्या पहाटे ७.३० वाजता एव्हरेस्टवर पोहचलो. त्या अत्युच्च शिखरावरून पाहताना केशरी रंग चढविलेला सूर्य हळूहळू वर येत होता. एव्हरेस्ट सर करण्यासह त्या टोकावरून सूर्योदय पाहण्याचे स्वप्नही पूर्ण झाले. हे दृश्य मी आयुष्यात कधीही विसरणार नाही, असे भावनिक मनोगत विदर्भाचा एव्हरेस्टवीर प्रणव बांडबुचे याने व्यक्त केले.सीएसी ऑलराऊंडर अ‍ॅडव्हेंचरतर्फे नागपूरचे भूषण ठरलेल्या प्रणव बांडबुचे याचा हृद्य सत्कार शुक्रवारी विष्णूजी की रसोई, बजाजनगर येथे करण्यात आला. यावेळी प्रणवने एव्हरेस्टच्या सर्वोच्च स्थानावर पोहचण्याचा प्रवास मांडला. याप्रसंगी मैत्री परिवारचे अध्यक्ष संजय भेंडे, निखिल मुंडले, तेजिंदर सिंह रेणू व शेफ विष्णू मनोहर उपस्थित होते. प्रणवने सांगितले, १५ एप्रिलला काठमांडूवरून हेलिकाप्टरने एव्हरेस्टच्या पायथ्याशी नामचे येथे पोहचलो. त्यानंतर १९ एप्रिलपासून रोटेशननुसार आमच्या टीमचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर बेस कॅम्पपासून १६ मे रोजी प्रत्यक्ष समिट पुशला सुरुवात झाली. पुढे पहिला डेथ झोन समजला जाणारा खुंब आईसफॉल पार केला.प्रणवने पुढे सांगितले, यावर्षीचे वातावरण अतिशय धोकादायक असल्याचे आधीच जाहीर करण्यात आले होते. त्यामुळेच यावर्षी ११ गिर्यारोहकांचे एव्हरेस्ट सर करताना मृत्यू झाले तर १४ लोकांना दृष्टिदोषाची समस्या निर्माण झाली. आधीच्या अंदाजानुसार आम्हाला २३ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. त्यामुळे समिट पुशपासून आम्ही आमचे नियोजन केले होते. सुदैवाने नियोजनानुसार बऱ्याच गोष्टी घडत गेल्या. त्यानुसार कॅम्प २, कॅम्प ३ आणि सर्वात धोकादायक कॅम्प ४ नंतरचा प्रवास करून आम्ही १९ मे रोजी साऊथ पोलला पोहचलो. तिथे अधिक वेळ न थांबता आमचा प्रवास सुरू केला आणि २० मेच्या पहाटे ७.३० वाजता आम्ही जगातील सर्वात उंच शिखरावर होतो. सर्वोच्च शिखरावर पोहचण्याचा आनंद शब्दात सांगू शकत नसल्याची भावना त्याने व्यक्त केली. शिखरावर गेले की खाली यावेच लागते. १० मिनिटे तेथे घालविल्यानंतर पुढचा धोका लक्षात घेऊन आम्हाला परतावे लागले व तो प्रसंग निराशादायी वाटल्याची भावना त्याने मांडली.प्रणव आता अनेक तरुणांचा प्रेरणास्रोत ठरला आहे. तो सांगतो, एकदा नापास झाले की पुन्हा परीक्षा देऊन पास व्हावेच लागते. माझेही तसेच झाले. २०१६ ला अपयशी झाल्यानंतर मला पास व्हायचे होते आणि हीच माझी प्रेरणा ठरल्याचे तो म्हणाला. खाली आलो तेव्हा नागपूरची अनेक मुले तयार होती. त्यांना पाहून थकवा दूर झाला व पुन्हा त्यांच्यासोबत बेस कॅम्पपर्यंत गेल्याचे त्याने सांगितले. त्याने गिर्यारोहणाच्या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध असल्याचे सांगत तरुणांना या क्षेत्रात येण्याचे आवाहन केले.यावेळी एव्हरेस्ट प्रवासात प्रणवने वापरलेले साहित्यही आणि प्रवासातील छायाचित्रांचे पडद्यावर प्रदर्शन येथे करण्यात आले. सीएसीचे अमोल खंते व विजय जत्थे यांनी संचालन केले.

टॅग्स :Everestएव्हरेस्ट