नागपूर : राज्याचे नवे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) म्हणून सुनील लिमये यांनी अलिकडेच पदभार स्वीकारला आहे.
नितीन काकोडकर ३० जूनला सेवानिवृत्त झाल्याने हे पद रिक्त झाले होते. २ जुलैपासून लिमये यांनी पदभार स्वीकारला आहे.
लिमये हे कोल्हापूरचे असून त्यांनी यापूर्वी कोल्हापूर वनपरिक्षेत्रातही काम केले आहे. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पदाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वी ते अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (पश्चिम मुंबई ) या पदावर कार्यरत होते. १९८८ च्या बॅचचे ते आयएफएस अधिकारी आहेत.
पश्चिम घाटात वृक्ष लागवडीपासून वन्यजीवांना जंगलातच पाणी उपलब्ध करणे, वणवा रोखण्यासाठी त्यांनी विशेष काम केले आहे. अलिबाग येथे आदिवासी विभागाचे आयुक्त, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे नागपूर विभागाचे व्यवस्थापकीय संचालक, मुख्य वनसंरक्षक पुणे, कोल्हापूर वनपरिक्षेत्रात उपवनसंरक्षक येथेही त्यांनी काम केले आहे.