लोकमत न्युज नेटवर्कनागपूर : मौजा गाडगा, धरमपेठ येथील डिक दवाखान्याच्या जवळील नागरी सुविधा व व्यापारी संकुलासाठी आरक्षित असलेल्या ०. ६५ हेक्टर जागेवर बीओटी तत्त्वावर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याच्या प्रस्तावाला मंगळवारी महापालिकेच्या विशेष सभेत मंजुरी देण्यात आली.येथे सुसज्ज असे ३७३ बेडचे स्टेट आॅफ आर्ट टेरिटरी केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. या प्रस्तावाला राज्य सरकारने १६ फेब्रुवारी २०१८ रोजी मंजुरी दिली आहे. या हॉस्पिटलमध्ये सर्वप्रकारच्या अत्याधुनिक आरोग्य सुविधा मिळणार आहे. हॉस्पिटल उभारण्यासंदर्भातील करार व महापालिकेचे हित याबाबतचे प्रस्ताव सभागृहाला उपलब्ध केले जातील. त्यानंतरच या प्रस्तावाला अंतिम मंजुरी दिली जाईल, अशी माहिती सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी दिली.बीओटी तत्त्वावरील प्रकल्पावर आक्षेप घेत प्रफुल्ल गुडधे यांनी आजवर या धर्तीवर सभागृहात आलेल्या प्रस्तावामुळे महापालिकेचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आणले. कोट्यवधीची जमीन संस्थेला दिली जाणार आहे. परंतु याचा लाभ कुणाला मिळणार यात स्पष्टता असायला हवी, अशी भूमिका त्यांनी मांडली.
नागपूर मनपा बीओटीवर उभारणार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:44 AM
मौजा गाडगा, धरमपेठ येथील डिक दवाखान्याच्या जवळील नागरी सुविधा व व्यापारी संकुलासाठी आरक्षित असलेल्या ०. ६५ हेक्टर जागेवर बीओटी तत्त्वावर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याच्या प्रस्तावाला मंगळवारी महापालिकेच्या विशेष सभेत मंजुरी देण्यात आली.
ठळक मुद्देमौजा गाडगा येथे ०.६५ हेक्टर जागा देण्याचा प्रस्ताव मंजूर