शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल : महिनाभरापासून रखडले मूत्रपिंड प्रत्यारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 12:01 AM

दोन्ही मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णांसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आशेचे किरण ठरले आहे. परंतु मूत्रपिंड प्रत्यारोपण झालेल्या रुग्णाच्या देखभालीसाठी येथे एकच विशेष कक्ष आहे.

ठळक मुद्देएकच विशेष कक्ष : १५ वर रुग्ण मृत्यूच्या दाढेत

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : दोन्ही मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णांसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आशेचे किरण ठरले आहे. परंतु मूत्रपिंड प्रत्यारोपण झालेल्या रुग्णाच्या देखभालीसाठी येथे एकच विशेष कक्ष आहे. जोपर्यंत या कक्षातील रुग्णाला सुटी मिळत नाही तोपर्यंत नवी शस्त्रक्रिया होत नाही. याच कारणामुळे २७ ऑगस्टपासून आतापर्यंत एकही प्रत्यारोपण झालेले नाही. शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत असलेल्या १५ वर रुग्ण मृत्यूच्या दाढेत जगत आहेत.वैद्यकीय शिक्षण विभागाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये पहिले मूत्रपिंड प्रत्यारोपण केंद्र नागपूरच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सुरू झाले. फेब्रुवारी २०१६ मध्ये पहिली शस्त्रक्रिया झाली. तेव्हापासून ते आतापर्यंत ५५ रुग्णांवर मूत्रपिंड प्रत्यारोपण करून त्यांना जीवनदान देण्यात आले आहे. ही शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून होत असल्याने अलीकडे रुग्णांची गर्दी वाढली आहे. त्यातुलनेत केंद्रातील सोयी अपुऱ्या पडत आहेत. विशेषत: प्रत्यारोपण झाल्यानंतर रुग्णाला विशेष देखभालीची गरज असते. हा विशेष कक्ष केवळ एकच आहे. रुग्णाला साधारण एक आठवडा तरी या कक्षात ठेवावे लागते. प्रकृती बिघडल्यास हा कालावधी वाढतो. यामुळे नवे प्रत्यारोपण थांबविले जाते. प्राप्त माहितीनुसार, १४ ऑगस्टला व त्यानंतर २७ ऑगस्टला ‘ब्रेन डेड’ रुग्णाकडून मिळालेल्या मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण करण्यात आले. विशेष कक्ष रिकामाच झाला नाही. यामुळे नातेवाईकांकडून दिले जाणारे मूत्रपिंड प्रत्यारोपण थांबलेले आहे. आता महिना होत असतानाही प्रत्यारोपण झाले नसल्याने प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेतील रुग्णांची यादी वाढत चालली आहे. सद्यस्थितीत शस्त्रक्रियेसाठी साधारण तीन ते चार रुग्ण ‘फिट’ असून १५वर रुग्ण प्रतीक्षेत आहेत.मूत्रपिंड प्रत्यारोपण केंद्राच्या विकासाची गरज‘सुपर’चे मूत्रपिंड प्रत्यारोपण केंद्र हे नेफ्रोलॉजी विभागामार्फत चालविले जाते. मूत्रपिंड प्रत्यारोपण रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता या केंद्राच्या विकासाची गरज आहे. तज्ज्ञानुसार, पूर्णवेळ मूत्रपिंड प्रत्यारोपण तज्ज्ञ, यूरोलॉजी, नेफ्रोलॉजीसह आरोग्य अधिकारी, परिचारिका व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. शिवाय, दोन विशेष कक्षासह आवश्यक अद्ययावत यंत्रसामुग्री महत्त्वाची आहे. आठवड्यात एका प्रत्यारोपणाचा प्रयत्नपूर्वी महिन्यातून एक किंवा दोन प्रत्यारोपण व्हायचे. आता दर आठवड्याला एक प्रत्यारोपण होत आहे. परंतु प्रत्यारोपणानंतर रुग्णाच्या विशेष देखभालीसाठी एकच कक्ष आहे. यामुळे कक्षातून रुग्णाला सुटी मिळेपर्यंत नवे प्रत्यारोपण थांबविले जाते.डॉ. चारुलता बावनकुळेविभागप्रमुख, नेफ्रोलॉजी, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल

टॅग्स :hospitalहॉस्पिटल