शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल : विदर्भातील मूतखड्याचे रुग्ण अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2019 11:20 PM

मूत्राशयातील खड्याचे तुकडे करणारे यंत्र ‘लिथोट्रिप्सी’ विदर्भात केवळ ‘सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’मध्येच आहे. विना शस्त्रक्रिया होणारी ही उपचार पद्धती खासगी इस्पितळात महागडी आहे. यामुळे मूतखड्याने त्रस्त असलेले मोठ्या संख्येत रुग्ण ‘सुपर’ला येतात. वर्षभरात ७०० वर रुग्णांवर हा उपचार केला जातो. परंतु १५ वर्षे जुने, कालबाह्य झालेले ‘लिथोट्रिप्सी’ यंत्र शुक्रवारी पुन्हा बंद पडले. यामुळे गाव-खेड्यातून येणाऱ्या रुग्णांना आता असह्य दुखणे सहन करीत यंत्र दुरुस्त होण्याच्या प्रतीक्षेत दिवस काढावे लागणार आहे.

ठळक मुद्देकालबाह्य झालेले ‘लिथोट्रिप्सी’ यंत्र पुन्हा बंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मूत्राशयातील खड्याचे तुकडे करणारे यंत्र ‘लिथोट्रिप्सी’ विदर्भात केवळ ‘सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’मध्येच आहे. विना शस्त्रक्रिया होणारी ही उपचार पद्धती खासगी इस्पितळात महागडी आहे. यामुळे मूतखड्याने त्रस्त असलेले मोठ्या संख्येत रुग्ण ‘सुपर’ला येतात. वर्षभरात ७०० वर रुग्णांवर हा उपचार केला जातो. परंतु १५ वर्षे जुने, कालबाह्य झालेले ‘लिथोट्रिप्सी’ यंत्र शुक्रवारी पुन्हा बंद पडले. यामुळे गाव-खेड्यातून येणाऱ्या रुग्णांना आता असह्य दुखणे सहन करीत यंत्र दुरुस्त होण्याच्या प्रतीक्षेत दिवस काढावे लागणार आहे.विदर्भात गरम वातावरणाच्या शहरांमध्ये जिथे घाम जास्त जातो, तिथे पाणी कमी पिणाऱ्यांना ‘किडनी स्टोन’ म्हणजे मूतखडा होण्याचा धोका वाढतो. विशेषत: उन्हाळ्यात अशा रुग्णांची संख्या वाढते. मूत्राशयातील खडा हजारपेक्षा कमी घनेतेचा आणि दीड सेंटीमीटरपेक्षा कमी रुंदीचा असेल तर ‘एक्स्ट्रा कॉर्पोरिअल शॉकवेव्ह लिथोट्रिप्सी’ यंत्रामुळे शस्त्रक्रिया टाळणे शक्य होते. या यंत्राच्या साहाय्याने लेझरद्वारे किडनीतील मूतखडे खसखशीच्या दाण्यांसारखे फोडले जातात. नंतर ते लघुशंकेद्वारे बाहेर फेकले जातात. २००४ मध्ये शासनाने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या यूरोलॉजी विभागाला १ कोटी ५५ लाखाचे हे यंत्र उपलब्ध करून दिले. या यंत्राद्वारे दरवर्षी ६०० ते ७०० रुग्णांवर यशस्वी उपचार होतात. परंतु ‘डॉर्निअर डेल्टा १’ हे यंत्र आता कालबाह्य झाले आहे. संबंधित कंपनीने याची माहिती रुग्णालयाला दिली आहे. कंपनीने यंत्राचे ‘पार्ट’ तयार करणे बंद केल्याचेही सांगितले आहे. तरीही लाखो रुपये खर्च करून हे यंत्र दुरुस्त केले जात आहे. विशेष म्हणजे, चार कोटीचे नवे यंत्र खरेदीचा प्रस्ताव तत्कालीन विशेष कार्य अधिकारी डॉ. मनीष श्रीगिरीवार असताना, माजी अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्यामार्फत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठविण्यात आला होता. तेथून हा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे गेला. त्यांच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाकडे आला. परंतु अद्यापही याला मंजुरी मिळालेली नाही. आता पुन्हा यंत्र बंद पडल्याने नवे यंत्र खरेदीसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. रुग्णांची संख्या पाहता वैद्यकीय शिक्षण विभागाने याला गंभीरतेने घेणे आवश्यक आहे.दुरुस्तीसाठी लागतात चार-पाच लाख‘लिथोट्रिप्सी’ यंत्राच्या दुरुस्तीचा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे. दुरुस्तीवर चार ते पाच लाखांचा खर्च होतो. परंतु कालबाह्य झालेल्या यंत्रावर लाखो रुपयांचा खर्च करण्यापेक्षा नवे अद्ययावत ‘डॉर्निअर डेल्टा-२’ यंत्र खरेदी केल्यास याचा फायदा रुग्णांसोबतच प्रशासनाला होईल, असे बोलले जात आहे.

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलVidarbhaविदर्भ