लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर लोकसभा मतदारसंघात उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. मतदानाच्या अगोदरचा शेवटचा रविवार हा प्रचाराच्या दृष्टीने ‘सुपर संडे’ ठरणार आहे. सर्वच पक्षांकडून विविध माध्यमांतून मतदारांपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचण्याचा प्रयत्न होणार आहे. शिवाय शहरासह जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कॉंग्रेसचे खा.कुमार केतकर, हुसैन दलवाई या नेत्यांच्या सभा आयोजित करण्यात आल्या आहेत.नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. प्रचाराचा अंतिम दिवस ९ एप्रिल हा आहे. रविवारी मतदानाच्या अगोदरचा शेवटचा सुटीचा दिवस आहे. त्यामुळे प्रत्येकच उमेदवाराची प्रचार यंत्रणा त्यादृष्टीने मतदारांपर्यंत पोहोचणार आहे. भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे रविवारी दुपारी घोषणापत्र जाहीर करतील. यात मागील पाच वर्षांचे काम तसेच भविष्यातील ‘व्हिजन’ ते जनतेसमोर मांडतील. शिवाय सकाळच्या वेळी पूर्व नागपुरात प्रचार रॅलीचेदेखील आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी रामनगर तसेच झिंगाबाई टाकळी येथे गडकरी यांच्या प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित राहणार आहेत. सोबतच साहित्य, संगीत व कला क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत सायंकाळी ५ वाजता बाबूराव धनवटे सभागृह येथे संमेलनाचेदेखील आयोजन करण्यात आले आहे.दुसरीकडे कॉंग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्या प्रचारासाठी मल्लिकार्जुन खरगे, खा.कुमार केतकर, हुसैन दलवाई यांच्या प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले आहे. खरगे सायंकाळी तिरंगा चौक व गोळीबार चौक येथे मतदारांना साद घालतील. पृथ्वीराज चव्हाण हे तिरंगा चौक, सतरंजीपुरा येथे तर हुसैन दलवाई हे यशोधरानगर येथे प्रचारसभेला संबोधित करतील.जिल्ह्यातदेखील प्रचाराची धूमदरम्यान, रामटेक लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार कृपाल तुमाने यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे येणार आहेत. ते रविवारी दुपारी नागपुरात दाखल होतील. त्यानंतर सायंकाळी कळमेश्वर व त्यानंतर कन्हान येथे प्रचार सभांना संबोधित करतील. कॉंग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांच्यासाठी मल्लिकार्जुन खरगे हे दुपारी उमरेड येथे मतदारांना आवाहन करतील.कार्यकर्त्यांचा गृहसंपर्कावर भरदरम्यान, रविवारी सर्वच पक्षांकडून सकाळपासूनच गृहसंपर्कावर भर देण्यात येणार आहे. यादृष्टीने कार्यकर्त्यांचे नियोजन करण्यात आले आहे. शिवाय नेते व पदाधिकारीदेखील जनतेमध्ये जाणार आहेत. उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे सकाळी लवकरच पदयात्रांना सुरुवात होईल.
रविवार ठरणार प्रचाराचा ‘सुपर संडे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2019 1:19 AM
नागपूर लोकसभा मतदारसंघात उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. मतदानाच्या अगोदरचा शेवटचा रविवार हा प्रचाराच्या दृष्टीने ‘सुपर संडे’ ठरणार आहे. सर्वच पक्षांकडून विविध माध्यमांतून मतदारांपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचण्याचा प्रयत्न होणार आहे. शिवाय शहरासह जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कॉंग्रेसचे खा.कुमार केतकर, हुसैन दलवाई या नेत्यांच्या सभा आयोजित करण्यात आल्या आहेत.
ठळक मुद्देमहायुतीसाठी मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे यांच्या सभा : महाआघाडीसाठी खरगे, चव्हाण, दलवाई, केतकर मतदारांना साद घालणार