नागपूर : गेल्या काही वर्षांपासून बैलगाडी शर्यत बंद होती. शासनाने बैलगाडी शर्यत प्रेमींना आश्वस्त करून, न्यायालयात शेतकऱ्यांची सक्षमपणे बाजू मांडली. बैलगाड्या शर्यती हा राज्यातील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. या निर्णयामुळे ते आनंद व्यक्त करत आहेत.
राज्य शासनाच्या पाठपुराव्याने शंकरपटाला महाराष्ट्रात अखेर परवानगी मिळाली आहे. शंकरपट राज्यात पुन्हा सुरू करण्याचे बैलगाडीप्रेमींना आश्वासन दिले होते, त्याची पूर्तता झाली. गेल्या काही वर्षांपासून शंकरपट बंद होता. राज्य सरकारने न्यायालयात शेतकऱ्यांची सक्षमपणे बाजू मांडली. बैलांवर ग्रामीण अर्थव्यवस्था अवलंबून असल्याने या निर्णयामुळे त्यांना अर्थिक हातभार लागणार असल्याची प्रतिक्रिया पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी दिली. बैलांवर ग्रामीण अर्थव्यवस्था अवलंबून असल्याने या निर्णयामुळे त्यांना आर्थित हातभार लागणार असल्याचे केदार म्हणाले.
बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिल्यानंतर विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयाचे आभार मानले आहे. आमचा अतिशय पारंपारिक खेळ असलेल्या बैलगाडा शर्यतीवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी मागे घेतली, याबद्दल मी न्यायालयाचे मनापासून आभार मानतो. २०१४ साली न्यायालयाने ही बंदी टाकली. आमचे सरकार राज्यात आल्यावर, मी स्वत: यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.