शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार’ नव्या पिढीसाठी प्रेरणादायी मंच; देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांचे गौरवोद्गार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 5:31 AM

आपल्या देशाची संगीत परंपरा समोर नेण्याचे काम ज्योत्स्ना दर्डा यांनी आयुष्यभर केले. त्यांच्या पुढाकारातूनच संगीतक्षेत्रातील युवा व प्रतिभावंत कलाकारांना प्रोत्साहन मिळाले.

नागपूर : आपल्या देशाची संगीत परंपरा समोर नेण्याचे काम ज्योत्स्ना दर्डा यांनी आयुष्यभर केले. त्यांच्या पुढाकारातूनच संगीतक्षेत्रातील युवा व प्रतिभावंत कलाकारांना प्रोत्साहन मिळाले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा ‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार’ हा युवा कलाकारांना हक्काचा मंच प्रदान करतो आहे, असे गौरवोद्गार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी काढले. लोकमत सखी मंचच्या संस्थापक तसेच संगीतसाधक श्रीमती ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिनिमित्त ‘लोकमत मीडिया प्रा.लि.’तर्फे आयोजित ‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार-२०१९’ सोहळा शनिवारी नागपूर येथील विभागीय क्रीडा संकुल येथे थाटात पार पडला.लोकमत सखी मंचच्या संस्थापक अध्यक्षा ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणाऱ्या ‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार-२०१९’चे वितरण शनिवारी नागपुरातील मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात थाटात झाले. या शानदार सोहळ्यात सुमधूर आवाज आणि सांगितिक कौशल्याने महाराष्ट्रावर जादू करणाऱ्या ‘सा रे ग म प’ फेम आर्या आंबेकर व महान शास्त्रीय संगीत कलावंत तौफिक कुरेशी यांचे चिरंजीव शिखर नाद कुरेशी यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाज बांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार-२०१९’ने गौरविण्यात आले. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, ‘लोकमत’ वृत्तपत्रसमूहाच्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, लोकमतचे ‘एडिटर इन चीफ’ राजेंद्र दर्डा, अमृता देवेंद्र फडणवीस, ‘सेलो’चे ‘सीईओ’ प्रदीप राठोड, पुरस्कार निवड समितीच्या सदस्य सुनाली राठोड, गौरी यादवडकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.हजारो संगीत रसिकांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात सुमधूर आवाज आणि सांगितिक कौशल्याने महाराष्ट्रावर जादू करणाºया ‘सा रे ग म प’ फेम आर्या आंबेकर व महान शास्त्रीय संगीत कलावंत तौफिक कुरेशी यांचे चिरंजीव शिखर नाद कुरेशी यांना देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल आणि प्रत्येकी एक लाख रुपयांचा निधी असे पुरस्काराचे स्वरूप होते. याप्रसंगी ‘बॉलिवूड’च्या प्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषाल यांच्या ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’मधील सादरीकरणाने रसिक अक्षरश: मोहित झाले.कार्यक्रमाला केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, ‘लोकमत’च्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा, लोकमतचे ‘एडिटर इन चीफ’ राजेंद्र दर्डा, लोकमतचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, लोकमतचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक व संपादकीय संचालक ऋषी दर्डा, कार्यकारी संचालक करण दर्डा, लोकमत सखी मंचच्या अध्यक्ष आशू दर्डा, ज्वेलरी डिझायनर पूर्वा कोठारी, सुनित कोठारी, अमृता देवेंद्र फडणवीस, ‘सेलो’चे ‘एमडी’ प्रदीप राठोड, पुरस्कार निवड समितीच्या सदस्य सुनाली राठोड, रेडिसन ब्ल्यूचे महाव्यवस्थापक मनोज बाली, गौरी यादवडकर, उषा काकडे, युवराज धमाले प्रामुख्याने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन झाले. विजय दर्डा यांनी प्रास्ताविकातून ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतींना उजाळा दिला. संगीत क्षेत्रातील युवा आणि बहुमुखी प्रतिभांच्या सन्मान सोहळ्याचे हे सहावे वर्ष आहे. देशभरातील संगीत प्रतिभांना शोधून त्यांना प्रोत्साहित करणे हा पुरस्काराचा मूळ उद्देश आहे, असे दर्डा म्हणाले. संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले.श्रेयाची जादू..स्वरांची नशा...ज्या स्वरांची जादू देशभराच्या संगीत रसिकांवर ओसंडून वाहते त्या श्रेया घोषालच्या स्वरांना प्रत्यक्ष ऐकण्यासाठी नागपूरकरांचे मन अधीर झाले होते. ती जादूई स्वरांची सम्राज्ञी दाखल झाल्याची घोषणा केली आणि एकच जल्लोष... खास मराठमोळ््या अंदाजातील संगीत वाद्ययंत्रांवर घुमले... आणि ‘मशहूर मेरे इष्क की कहानी हो गई...’ म्हणत फ्लॅशलाईटच्या प्रकाशात ती स्वरांची अप्सरा मंचावर अवतरली. ग्रे रंगाच्या पार्टी गाऊनवर चमचमणारे तारे.. स्वरमाधुर्याचे लेण लाभलेले देखणे रूप आणि सुरांचे सौंदर्य थेट रसिकांच्या हृदयापर्यंत वाहवत नेणाºया नजाकती.. सार काही तिच्याच बाजूने. टाळ््यांचा कडकडाट अन् प्रेक्षकांच्या आरोळ््या स्टेडियममध्ये घुमल्या... या प्रेमाने तीही ‘दिवानी... मस्तानी...’ होऊन गात राहिली. पुढचे दोन-अडीच तास तिचे स्वर निनादत होते आणि उपस्थित श्रोते या भारावलेल्या क्षणांच्या आठवणी डोळ््यात, नव्हे हृदयात साठवत होते.‘हृदयात वाजे समथिंग...’‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कारा’च्या सहाव्या पर्वातील दुसरी विजेता महाराष्टÑाची लाडकी गायिका आर्या आंबेकर यांनीही यावेळी श्रोत्यांना गायनाची प्रसन्न अनुभूती दिली. नागपुरात जन्मलेल्या आर्याला स्वरांची दैवी देणगी लाभली आहे. अतिशय गोड गळ्याच्या या गायिकेने तिच्या अभिनयाची कारकीर्द सुरू झालेल्या ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातील ‘हृदयात वाजे समथिंग...’ हे गाणं सादर करीत रसिकांची वाहवा मिळविली. तिच्या येऊ घातलेल्या अल्बममधील ‘दिवा लागू दे रे देवा...’ सादर केले. श्रोत्यांच्या फर्माईशवर तिने ‘लग जा गले..., बाहों मे चले आ...’ अशी हिंदी गाणीही सादर केली. तिला शिखर नादसह परिमल जोशी, पंकज यादव व राजू गजभिये या वाद्यकलावंतांनी साथ दिली. पुरस्कार प्रदान करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तिला गाण्याची फर्माईश केली. आर्याने त्यांच्या आवडीसाठी मराठी मालिकेचे ‘तुला पाहते रे...’ हे टायटल गीत पुन्हा सादर केले.शिखर नादने जेम्बेवर बांधला समा२०१९ चा सूर ज्योत्स्ना राष्टÑीय संगीत पुरस्कार विजेता ड्रम आर्टिस्ट शिखर नाद कुरैशी यांनीही त्यांच्या कलेतील कौशल्याची झलक समारंभात दाखविली. शिखर नाद हे महान शास्त्रीय संगीत कलावंत तौफिक कुरेशी यांचे चिरंजीव व शिष्य, ख्यातनाम तबलावादक उस्ताद अल्लारखा यांचे नातू आणि उस्ताद झाकीर हुसैन यांचे पुतणे. त्यांच्या वडिलांनी तबलावादन कलेचा आफ्रिकन ड्रम जेम्बेवर प्रयोग केला होता. शिखर नाद कुरेशी यांनी हाच वारसा पुढे चालविला आहे. जेम्बे हे तबल्यासारखेच वाद्य. शिखर यांच्या बोटांची थाप या वाद्यावर पडताच त्यातून निघणारे सूरही थिरकतच सभागृहात घुमले आणि प्रत्येक श्रोता ‘वाह उस्ताद...’ म्हणत मंत्रमुग्धपणे ते ऐकत होता. शिखर यांच्या बोटातून डीजेम्बेवर निनादणाºया सुरांनी मैफिलीत एक वेगळा आनंद निर्माण केला.अमृता फडणवीस यांनी जिंकली मनेया संगीत समारोहात गायिका व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आवर्जून हजेरी लावली. यावेळी त्यांना काही गाण्याचा आग्रह मान्यवरांनी केला. त्यांनीही फर्माईश पूर्ण करीत ‘अच्युतम केशवम कृष्ण दामोधरम्...’ ही भक्तिरचना सादर करीत समस्त दर्शकांची मने जिंकली.

टॅग्स :nagpurनागपूर