शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

सुरेल गीतांचा ‘एक प्यार का नगमा है’

By admin | Published: November 16, 2014 12:46 AM

प्रेम ही शाश्वत भावना आहे. मानवाच्या उत्पत्तीपासून प्रेमाची भावना मानवाला खुणावत आली आहे. युगानुयुगे या भावनेवर कवी, साहित्यिकांनी लिहिले आहे; पण तरीही हा विषय वेगवेगळ्या अंगाने

स्वरतरंग म्युझिक अकादमीच्या कलावंतांचे सादरीकरण : नवोदित गायकांना रसिकांची दाद नागपूर : प्रेम ही शाश्वत भावना आहे. मानवाच्या उत्पत्तीपासून प्रेमाची भावना मानवाला खुणावत आली आहे. युगानुयुगे या भावनेवर कवी, साहित्यिकांनी लिहिले आहे; पण तरीही हा विषय वेगवेगळ्या अंगाने कलावंतांना भुरळ पाडणारा आहे. कुठल्याही कलाकृतीत प्रेम ही भावना त्या कलाकृतीला अधिक सौंदर्य प्रदान करणारी असते. याच भावनेवर आपल्या चित्रपटसंगीतात अनेक गीतांची रचना झाली. गीतांच्या माध्यमातून प्रेमाच्या विविध छटा सादर करीत नवोदित गायकांनी आज रसिकांची दाद घेतली. हा कार्यक्रम सायंटिफिक सभागृहात सादर करण्यात आला. या कार्यक्रमाची संकल्पना आणि मार्गदर्शन स्वरतरंग संगीत अकादमीचे संचालक निरंजन बोबडे यांची होती. ‘एक प्यार का नगमा है’ या शीर्षकाने आयोजित या कार्यक्रमात गायकांनी तयारीने सादरीकरण करून प्रेमाच्या विविध स्वरूपांचे सादरीकरण गीतांच्या माध्यमातून केले. निरंजन यांच्या मार्गदर्शनात तयार होत असलेल्या गायकांनी सफाईने सादरीकरण करताना त्यांच्यातील नवखेपणा अजिबात जाणवू दिला नाही. गीतांचा आशय आणि स्वर नेमकेपणाने सादर करण्याचा सर्वच गायक-गायिकांचा प्रामाणिक प्रयत्न रसिकांना दाद द्यायला भाग पाडणारा होता. कार्यक्रमाचा प्रारंभ प्रार्थनेने करण्यात आला. त्यानंतर भक्ती मराठेने ‘पंख होती तो उड आती रे...’ या उपशास्त्रीय गीताने प्रारंभीच रसिकांच्या अपेक्षा उंचावल्या. संजीव भुसारी या ज्येष्ठ गायकाने ‘ख्वाब हो तुम या...’ या गीताने खासी वातावरणनिर्मिती साधली तर लहानग्या आनंद चिमोटेने ‘कुहू कुहू बोले कोयलिया...’ या गीताने आणि गौरी शिंदे यांनी सादर केलेल्या ‘काहे छेड छेड मोहे...’ या गीताने रंगत आणली. कार्यक्रमात भक्ती मराठे, संजीव भुसारी, आनंद चिमोटे, श्रद्धा तिडोले, राजेश हाके, गौरी शिंदे, वर्षा हेडाऊ, गायत्री मजुमदार, श्रुती शिरोळे, रुचा पांडे, ध्येय चासकर, सुनील लघाटे, नूतन आकोजवार, गौरी आपटे, वासंती गुंडावार, धनश्री पुराणिक, श्रेया खराबे यांनी विविध गीतांचे तयारीचे सादरीकरण करून कार्यक्रमाला उंची प्रदान केली. कार्यक्रमाचे निवेदन श्वेता शेलगावकर यांनी केले. महेंद्र ढोले यांनी सिंथेसायझरवर तर तबल्यावर श्रीकांत सूर्यवंशी यांनी सुयोग्य साथ केली. (प्रतिनिधी)