शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

अवयव दानासाठी सुरेल जनजागृती

By admin | Published: November 17, 2014 12:58 AM

अवयव दान ही संकल्पना भारतीयांनी आजही पाहिजे त्या प्रमाणात स्वीकारलेली नाही. स्पेन, इंग्लंड व अन्य काही देशांशी तुलना केल्यास भारतात अवयव दान करणाऱ्यांची संख्या फारच अत्यल्प आहे.

मोहन फाऊंडेशनचा कार्यक्रम : डॉक्टरांनी गायली गीतेनागपूर : अवयव दान ही संकल्पना भारतीयांनी आजही पाहिजे त्या प्रमाणात स्वीकारलेली नाही. स्पेन, इंग्लंड व अन्य काही देशांशी तुलना केल्यास भारतात अवयव दान करणाऱ्यांची संख्या फारच अत्यल्प आहे. यासाठी विविध बाबी कारणीभूत आहेत. ही विचारसरणी बदलण्याकरिता आज, रविवारी अवयव दानावर सुरेल जनजागृतीचा कार्यक्रम पार पडला. देशभरात अवयव दानाची चळवळ चालवित असलेल्या मोहन फाऊंडेशनतर्फे सिव्हिल लाईन्स येथील चिटणवीस सेंटरच्या मैदानावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात कोणी व्यावसायिक गायकाने नाही तर डॉक्टरांनी सुमधूर गीते गायली. आयोजकांनी उपस्थित श्रोत्यांना अवयव दानाचे महत्त्व पटवून देतानाच ही चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन केले. खरे पाहिले तर हा सांस्कृतिक कार्यक्रम नव्हताच. अवयव दानासाठी केलेला एक स्वर जागर होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेकांचे नि:स्वार्थी योगदान लाभले. श्रोतेही केवळ मनोरंजनासाठी आलेले नव्हते. त्यांना या चळवळीसंदर्भात आत्मियता होती. मोकळ्या मैदानावरील या कार्यक्रमात रिमझिम पावसाने थोडा व्यत्यय आणला, पण व्यापक उद्देशापुढे अशाप्रकारचा अडथळा गौणच ठरतो.डॉ. प्रशांत निंबाळकर यांच्या ‘गण नायकाय, गण देवताय...’ गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यानंतर डॉ. सुरेश अय्यर यांनी ‘आशाए...’, डॉ. गौरी अरोरा यांनी ‘आज फिर जिने की तमन्ना है...’, डॉ. सपना खानझोडे यांनी ‘कैसी पहेली है ये...’, डॉ. सुधीर भावे यांनी ‘आना है तो आ...’, डॉ. समीर जहागीरदार यांनी ‘अल्लाह के बंदे...’, डॉ. प्रदीप राजदेरकर यांनी ‘मै जिंदगी का साथ...’, डॉ. मुकुंद ओक यांनी ‘शूर आम्ही सरदार...’ तर डॉ. रवी वानखेडे यांनी ‘झगमग झगमग दिया जलाओ...’ हे गीत सादर केले. अन्य गायकांनीही श्रवणीय गीते गायली. सुरुवातीला मोहन फाऊंडेशनच्या नागपूर केंद्राचे संचालक डॉ. रवी वानखेडे यांनी कार्यक्रमासाठी मोलाची मदत करणाऱ्यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले. याशिवाय कार्यक्रमाच्या मध्यंतरात त्यांनी अवयव दानासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली. (प्रतिनिधी)