शहरं
Join us  
Trending Stories
1
रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात ICU मध्ये दाखल; सूत्रांची माहिती
2
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
3
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
4
लेबनॉनची अवस्था गाझासारखी करू; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा थेट इशारा
5
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
6
Smriti Mandhana ची शानदार फिफ्टी; ५०० धावांचा पल्लाही गाठला, पण...
7
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
8
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला
9
अजब गजब फिल्डिंग! Live मॅचमध्ये लाबूशेनने 'असा' उभा केला फिल्डर, अंपायरही चक्रावला (Video)
10
सूरतमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, गुंडांना पाहून मित्र पळाला
11
अमेरिकेसारखी सिस्टम बिहारमध्ये प्रशांत किशोर राबवणार; असं पहिल्यांदाच निवडणुकीत होणार! 
12
‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 
13
राहुल गांधींच्या पत्त्यावर ऑनलाइन जलेबी ...; काँग्रेसच्या जखमेवर भाजपनं चोळलं मीठ!
14
BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
15
"पवार साहेब म्हणाले, सगळीकडे आयात उमेदवार नाही", तिकीट वाटपाबद्दल रोहित पवारांचं विधान
16
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
17
शरद पवारांची चालाख खेळी: हजारो इच्छुकांच्या मुलाखती, पण बारामतीतील पत्ता राखून ठेवला!
18
अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांचा भाजप सरकारला पाठिंबा; मंत्रीपदाबाबत नवीन जिंदाल म्हणाले...
19
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
20
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला

सर्जरी कॅज्युअल्टी रुग्ण सेवेत

By admin | Published: January 14, 2015 12:43 AM

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) अपघात विभागात (कॅज्युअल्टी) होणारी गर्दी कमी करण्यासाठी आणि गंभीर रुग्णांना तत्काळ उपचार मिळावा यासाठी मेडिसीन व सर्जरी

मेडिकल : गर्दी कमी झाल्याने तत्काळ उपचारनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) अपघात विभागात (कॅज्युअल्टी) होणारी गर्दी कमी करण्यासाठी आणि गंभीर रुग्णांना तत्काळ उपचार मिळावा यासाठी मेडिसीन व सर्जरी कॅज्युअल्टी वेगवेगळी करण्याचा महत्त्वाचा निर्णय अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी घेतला. सोमवारपासून सुरू झालेल्या या कॅज्युअल्टीमुळे गंभीर रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.मेडिकलमध्ये मागील वर्षी १.९१ कोटी रुपये खर्च करून जुना अपघात विभाग बंद करून नवीन अपघात विभाग सुरू करण्यात आला. तीन मजल्यांचा प्रस्तावित असलेला हा विभाग मात्र तळमजल्यापर्यंतच मर्यादित राहिला. यातच अपघाती रुग्णांसाठी येथे विशेष सोयी उपलब्ध नव्हती. विशेष म्हणजे अतिदक्षता विभागाला वॉर्डाचे स्वरूप देण्यात आले होते. परिणामी रुग्णांची होत असलेली गर्दी, उपचारात होणारा उशीर, यातूनच निर्माण होणारे डॉक्टर आणि रुग्णांमध्ये वादावादीच्या प्रसंगामुळे मेडिकल प्रशासन अडचणीत आले होते. डॉ. निसवाडे यांच्याकडे पदभार येताच त्यांनी रुग्णाच्या सोयीसाठी कॅज्युअल्टीचे दोन विभाग करण्याचा निर्णय घेतला. जुन्या बंद असलेल्या कॅज्युअल्टीमध्ये अपघाताच्या रुग्णांवर तत्काळ उपचार करण्याची यंत्रणा उभी केली. त्यातही गंभीर असलेल्या रुग्णांसाठी या विभागात सहा खाटांचे अतिदक्षता विभागही निर्माण केले. सोमवारपासून हा विभाग रुग्णसेवेत येताच पहिल्याच दिवशी ५३ रुग्णांवर उपचार करण्यात आले तर नव्या कॅज्युअल्टीमध्ये जनरल मेडिसीन व पिडीयाट्रीक मेडिसीनचे रुग्ण तपासले जात आहे. ज्या रुग्णाच्या जीवाला धोका आहे अशा रुग्णांसाठी १५ खाटांचे अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही कॅज्युअल्टीच्या स्वच्छतेला घेऊन रुग्णांकडून कौतुक होत आहे.(प्रतिनिधी)