लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : येथील ट्रँझिट ट्रीटमेंट सेंटमध्ये दुर्मिळ असलेल्या ब्लॅक बिट्रन या पक्ष्याच्या तुटलेल्या पायावर शस्त्रक्रिया करून रॉड टाकण्यात आला.खापरखेडा पॉवर स्टेशनमध्ये इलेक्ट्रिकचा शॉक लागून एक पक्षी पडला असल्याची माहिती मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते यांना गिरीश खोरगडे या त्यांच्या मित्राकडून कळली. त्या पक्ष्याचा फोटोही पाठवला. ते पाहिल्यावर सेंटरमधील चमूने लगेच खापरखेडा जाऊन तो पक्षी उपचारासाठी सेंटरमध्ये दाखल केला. पक्षी पाहिल्यावर तो दुर्मिळ प्रजातीचा असल्याचे सर्वांच्या लक्षात आले. त्याच्यावर उपचार करून बरे करण्याचे सर्वांनी ठरविले.डॉ. सय्यद बिलाल व सिद्धार्थ मोरे यांनी रात्री त्यावर प्रथमोपचार केले. पक्ष्याच्या भोजनाची सोय व्हावी यासाठी सहयोगी समीर नेवारे यांनी तलावावरून जिवंत छोटे मासे आणले. पक्षी भुकेला असल्याने त्याने ते खाल्ले. दुसऱ्या दिवशी सकाळी डॉ. मयूर काटे व सय्यद बिलाल यांच्यासोबत चर्चा करून आॅपरेशन थिएटरला घेतले. तपासणीत त्याच्या पायाचे हाड तुटलेले लक्षात आले. एक्स रे काढल्यावर ते स्पष्ट झाले. अखेर जोखीम घेऊन आॅपरेशन सुरू केले. पक्ष्याच्या पायात रॉड घातला. पायात रॉड टाकण्याची तीन दिवसात दुसरी सर्जरी केली. एक्स रे काढून रॉड व्यवस्थित बसल्याची पुन्हा खात्री करण्यात आली. आता हा पक्षी बरा असून तो आपल्या पायावर उभा होईल आणि उडू शकेल, असा विश्वास या चमूने व्यक्त केला आहे.हा पक्षी दुरुस्त झाल्यावर त्याला त्याच्या अधिवासात सुरक्षितपणे परत पाठविणे हे आव्हान असल्याचे कुंदन हाते यांनी म्हटले आहे. मात्र ते सुद्धा पूर्ण यशस्वी केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.ये तो पूलिस से भी फास्ट हैएका लहान मुलीने दिलेली उत्स्फूर्त प्रतिक्रिया येथील ट्रान्झिटच्या चमूला बराच आत्मविश्वास देऊन गेली. मांजामध्ये अडकलेल्या शिकरा पक्ष्याला वाचविण्यासंदर्भात एक कॉल आला होता. या चमूने तात्काळ पोहचून पक्ष्याला मुक्त केले. त्यावर कॉल करणाºया व्यक्तीच्या लहान मुलीने ‘अरे यार, ये लोग तो पूलिस से भे फास्ट है’, अशी सहज प्रतिक्रिया दिली. मात्र तिचे हे वाक्यच या चमूचा आत्मविश्वास वाढविणारे ठरले.
दुर्मिळ ब्लॅक बिट्रनच्या पायावर शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 11:48 PM