शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

नागपुरात वाहतूक पोलिसांकडून सर्जिकल स्ट्राईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 11:33 PM

वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करून अपघात घडविण्यास कारणीभूत ठरणाऱ्या वाहनचालकांना वाहतुकीचे धडे देण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून मंगळवारी चौकाचौकात सर्जिकल स्ट्राईक केला गेला. या विशेष मोहिमेंतर्गत पहिल्याच दिवशी पोलिसांनी १२८५ वाहनचालकांवर चालान कारवाई केली. या कारवाईदरम्यान विद्यार्थ्यांनी जनजागरणही केले.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांकडून जनजागरण, पोलिसांकडून कारवाई : पहिल्याच दिवशी १२८५ वाहनचालकांना चालान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करून अपघात घडविण्यास कारणीभूत ठरणाऱ्या वाहनचालकांना वाहतुकीचे धडे देण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून मंगळवारी चौकाचौकात सर्जिकल स्ट्राईक केला गेला. या विशेष मोहिमेंतर्गत पहिल्याच दिवशी पोलिसांनी १२८५ वाहनचालकांवर चालान कारवाई केली. या कारवाईदरम्यान विद्यार्थ्यांनी जनजागरणही केले.वाहतुकीचे नियम तोडण्याची प्रवृत्ती हल्ली बळावली आहे. मोटार वाहन कायद्याच्या तरतुदीप्रमाणे वाहन न चालविता स्वत: आणि इतर नागरिकांच्या जीविताला धोका होईल अशा पद्धतीने काही जण वाहने चालवितात. अनेकांकडे वाहन चालविण्याचा परवानाच नसल्याचे दिसून येते. अनेक वाहनचालकांना मोटार वाहन कायद्याचे ज्ञान नसते. अल्पवयीन मुलेमुली बेदरकारपणे वाहने चालविताना दिसतात. त्यामुळे मोटार वाहन कायद्याची वाहनचालकांना तसेच सर्वसामान्य जनतेला माहिती देण्याकरिता ११ आणि १२ सप्टेंबरला सकाळी ९ ते ११ या वेळेत शहरातील सातही वाहतूक परिमंडळातील सर्व मुख्य चौकात आॅपरेशन सर्जिकल स्ट्राईक राबविण्यात येणार असल्याचे वाहतूक शाखेने जाहीर केले होते. वाहनचालकांनी हेल्मेटसह सर्व कागदपत्रे सोबत बाळगण्याचेही आवाहन करण्यात आले होते. मात्र, त्याला अनेक वाहनचालकांनी दाद दिली नाही. परिणामी, झिरो टॉलरन्स पॉर्इंटअंतर्गत कारवाईची विशेष मोहीम राबविण्यात आली. त्यात १२८५ वाहनचालकांना दंडात्मक कारवाईचा सामना करावा लागला. वाहतूक पोलिसांकडून ही कारवाई सुरू असताना विद्यार्थ्यांनीही जनजागरणासाठी सहभाग नोंदवला. त्यांनी स्लोगन आणि प्रत्यक्ष संवाद साधून वाहनचालकांना वाहतुकीच्या नियमाचे महत्त्व पटवून देण्याचे प्रयत्न केले.चौकनिहाय कारवाईचे स्वरूपवाहतुकीच्या नियमाचे सर्रास उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी चौकाचौकात केलेल्या कारवाईचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे. लॉ कॉलेज चौक ५६, व्हेरायटी चौक १०५, जुना काटोल नाका चौक ४०, एलआयसी चौक १५०, वाडी टी-पॉर्इंट १३५, बजाजनगर चौक ५५, तुकडोजी चौक ९६, सक्करदरा चौक ७९, अशोक चौक ६१, अग्रसेन चौक १८५, कडबी चौक १४४ आणि इंदोरा चौकात १७९ अशाप्रकारे एकूण १२८५ वाहनचालकांवर चालान कारवाई करण्यात आली. बुधवारीसुद्धा ही कारवाई केली जाणार आहे.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसsurgical strikeसर्जिकल स्ट्राइक