लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काँग्रेसने जाहीर केलेल्या घोषणापत्रावर देशाच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी नागपुरात टीकास्त्र सोडले. काँग्रेसने जारी केलेले घोषणापत्र हे देशद्रोही व फुटीरवाद्यांना खूष करणारे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला ‘सर्जिकल स्ट्राईक’च्या माध्यमातून उत्तर दिले. तर राहुल गांधी देशद्रोहाला अपराध मानण्यास नकार देत आहेत. हाच एक चौकीदार व राजकुमार यांच्यातील फरक आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. नागपुरात महिला मेळाव्यास संबोधित करताना त्या बोलत होत्या.जगनाडे चौकाजवळ आयोजित या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री व भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी, भाजपाचे शहराध्यक्ष आ.सुधाकर कोहळे, ‘बरिएमं’च्या नेत्या अॅड.सुलेखा कुंभारे, महापौर नंदा जिचकार, संस्कार भारतीच्या अध्यक्षा कांचन गडकरी, माजी महापौर अर्चना डेहनकर, भाजपाच्या महिला आघाडी अध्यक्षा किर्तीदा अजमेरा प्रामुख्याने उपस्थित होते. केंद्र सरकारने फुटीरवाद्यांच्या सवलती बंद केल्या. मात्र काँग्रेसचे लोक फुटीरवाद्यांशी चर्चा करताना दिसून येतात. मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला जगापासून एकटे पाडण्याची संधी भारताकडे होती. मात्र तत्कालीन काँग्रेस सरकारने केवळ पत्र लिहून पाकिस्तानने दहशतवाद्यांवर कारवाई करावी, असे म्हटले होते. मात्र उरी व पुलवामा येथील हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सैन्याला पूर्ण मोकळीक दिली होती. सोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील समर्थन मिळविले. हा देशाचा सैन्यशक्ती व कूटनीतीचा विजय होता, असे स्वराज म्हणाल्या.विदेशात एखादा भारतीय संकटात असल्यावर ‘टिष्ट्वट’ करून कळवितो. त्यानंतर २४ तासात त्याला दिलासा मिळालेला असतो. मागील पाच वर्षांत आम्ही विदेशात अडकलेल्या २ लाख २६ हजार लोकांना सुरक्षित देशात परत आणले, असेदेखील सुषमा स्वराज यांनी सांगितले.‘बुद्धिस्ट सर्किट’मुळे देशाचे नाव उंचावले : गडकरीमाझ्या कार्यकाळात रस्तेबांधणीची कामे वेगाने झाली. विशेषत: ‘बुद्धिस्ट सर्किट’चे काम प्रगतीपथावर असल्याचे समाधान आहे. मी गौतम बुद्ध यांच्या विचारांनी प्रभावित झालो आहे. या कामामुळे दक्षिण पूर्व आशियामध्ये देशाचे नाव निश्चित उंचावले आहे, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. कुठल्याही शहरात रोजगारनिर्मितीसाठी गुंतवणूक आणायची असेल तर तशा सुविधा निर्माण कराव्या लागतात. आम्हाला सर्वसामान्य कुटुंबातील मुलांच्या रोजगाराची चिंता आहे व त्यादृष्टीने आम्ही पावले उचलली आहेत. मात्र विरोधकांना केवळ स्वत:च्या मुलांच्याच रोजगाराची चिंता आहे, असेदखील ते म्हणाले. यावेळी त्यांनी विरोधकांच्या वक्तव्यांवर कुठलेही भाष्य करण्याचे टाळले. जे काहीच काम करत नाहीत ते वायफळ गोष्टी करतात असे ते म्हणाले.
काँग्रेसचे घोषणापत्र देशद्रोही व फुटीरवाद्यांना खूष करणारे : सुषमा स्वराज यांचे टीकास्त्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2019 12:23 AM
काँग्रेसने जाहीर केलेल्या घोषणापत्रावर देशाच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी नागपुरात टीकास्त्र सोडले. काँग्रेसने जारी केलेले घोषणापत्र हे देशद्रोही व फुटीरवाद्यांना खूष करणारे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला ‘सर्जिकल स्ट्राईक’च्या माध्यमातून उत्तर दिले. तर राहुल गांधी देशद्रोहाला अपराध मानण्यास नकार देत आहेत. हाच एक चौकीदार व राजकुमार यांच्यातील फरक आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. नागपुरात महिला मेळाव्यास संबोधित करताना त्या बोलत होत्या.
ठळक मुद्देपाच वर्षांत विदेशात अडकलेल्या सव्वादोन लाख भारतीयांना परत आणले