लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रायपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये (एम्स) उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेला एका ५४ वर्षीय पुरुष रुग्णाला रविवारी नागपूरच्या मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. या रुग्णासह चार तर मेयोमध्ये आठ नव्या संशयित रुग्णांना भरती करण्यात आले. शनिवारी तपासणीसाठी पाठविण्यात अलोल्या २८ नमुन्यांमधून २१ नमुने निगेटिव्ह आले आहेत. उर्वरीत सात व आजच्या १४ नमुन्यांचा अहवाल रात्री उशिरा येण्याची शक्यता आहे.इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत गेल्या तीन आठवड्यात कोरोना संशयित रुग्णांचे १७० नमुने तपासण्यात आले. तब्बल १६६ नमुने निगेटिव्ह आले. ही एक दिलासा देणारी बाब आहे. नागरिकांनी मात्र ३१ मार्चपर्यंत घरीच रहावे, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) दाखल झालेल्या चार रुग्णांमध्ये एक पुरुष तर तीन महिलांचा समावेश आहे. यात ५५, ४३ व ३४ वर्षीय महिला या अमेरिकेतून प्रवास करून आल्या आहेत. या तिघींना घशाचा त्रास आहे. या संश्यितासह ५४ वर्षीय पुरुषाचे नमुने मेयोत पाठविण्यात आले आहे. मेडिकलमध्ये या रुग्णांसह जुने दोन असे सहा संशयित तर तीन पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. मेयोमध्ये दिवसभरात आठ संशयित रुग्णांना भरती करण्यात आले.विलगीकरण कक्षात ८६ प्रवासीडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत ११२३ प्रवासी आले. यातील ८६ प्रवासांना आमदार निवासाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे तर उर्वरीत १०३७ प्रवाशांंना घरी पाठवून कुठेही न जाण्याचा सूचना केल्या आहेत. या प्रवाशांच्या प्रकृतीवर आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे.
एम्समधील रुग्णाच्या संपर्कात आलेला संशयित नागपुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 11:55 AM
रायपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये (एम्स) उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेला एका ५४ वर्षीय पुरुष रुग्णाला रविवारी नागपूरच्या मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले.
ठळक मुद्देमेयो, मेडिकलमध्ये कोरोना संशयित १२ रुग्णांची भर