शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
4
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
5
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
6
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित ठाकरेंना विधान परिषदेवरून आमदारकीची ऑफर दिली होती- देवेंद्र फडणवीस
7
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
8
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
9
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
10
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
11
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
12
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
13
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
14
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
15
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
16
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
17
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
18
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
19
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
20
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य

नागपुरातून बेपत्ता मुलींच्या अपहरणाचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 7:59 PM

सदरमधून संशयास्पदरीत्या बेपत्ता झालेल्या दोन शाळकरी मुलींचा अद्यापही शोध लागला नसल्याने त्यांचे अपहरण झाल्याचा संशय बळावला आहे. दरम्यान, पोलिसांसोबतच आता कुटुंबीयांनीही मुलीचे अपहरण करणाऱ्या  संशयितांना अधोेरेखित करण्यासाठी धावपळ चालवली आहे.

ठळक मुद्देमहिनाभरापासून बेपत्ता : पालक आणि पोलिसांची शोधाशोध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सदरमधून संशयास्पदरीत्या बेपत्ता झालेल्या दोन शाळकरी मुलींचा अद्यापही शोध लागला नसल्याने त्यांचे अपहरण झाल्याचा संशय बळावला आहे. दरम्यान, पोलिसांसोबतच आता कुटुंबीयांनीही मुलीचे अपहरण करणाऱ्या  संशयितांना अधोेरेखित करण्यासाठी धावपळ चालवली आहे. पायल सुधीर टेंभुर्णे (वय १३) आणि तनिशा चरणदास टेंभुर्णे (वय १४) अशी बेपत्ता मुलींची नावे आहेत. या दोघी चुलत बहिणी असून, सदरमध्ये मोहननगर, खलाशी लाईनमध्ये त्यांचे निवासस्थान आहे. दुकानातून रिबीन घेऊन येतो असे सांगून या दोघी १६ फेब्रुवारीला घराबाहेर गेल्या. रात्र झाली तरी त्या परतल्या नाही, त्यामुळे पालकांनी त्यांची शोधाशोध केली. मात्र, त्यांचा शोध लागला नाही. अभ्यासात हुशार असलेल्या या दोघी सोबत घरून निघून जाण्याचे कोणतेही कारण नाही. त्यांचे कुणीतरी पूर्वनियोजित पद्धतीने अपहरणच केले असावे, असा दाट संशय आहे. पालकांनी सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्यात अपहरणाचा संशय व्यक्त केला आहे. सदरचे ठाणेदार सुनील बोंडे आणि त्यांच्या सहकाºयांनी या मुलींचा शोध घेण्यासाठी प्रयत्न चालविले आहे. मुलींच्या मैत्रिणी आणि ओळखीच्यांकडून काही धागेदोरे मिळाल्याचे समजते. या दोघींना गुंगीचे औषध देऊन कुणीतरी पळवून नेल्याचा संशय दाट झाला आहे.सायबर सेलचीही मदतपायल आणि तनिशा तसेच त्यांना पळवून नेणाºयांचा पोलीस शोध घेत आहेत. सायबर सेलचीही यासाठी मदत घेतली जात आहे. या संबंधाने सदर पोलिसांकडे विचारणा केली असता, प्रकरण संवेदनशील असून, त्याबद्दल काही बोलणे योग्य होणार नसल्याचे पोलीस सांगत आहेत. बेपत्ता मुलींचा शोध घेतला जात आहे, एवढेच पोलीस सांगत आहेत. दरम्यान, महिनाभरापासून मुली बेपत्ता असल्याने मुलींच्या आईची प्रकृती ढासळली आहे.

टॅग्स :Kidnappingअपहरणnagpurनागपूर