किचनमध्ये आढळली घाण : एफडीएवरही आरोपनागपूर : सीपी क्लबच्या संदर्भात मिळालेल्या तक्रारीवरून किचनची तपासणी केली असता घाण असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने(एफडीए)सीपी क्लबचा परवाना एका महिन्यासाठी निलंबित केला. निलंबनापूर्वी एफडीएने क्लबला व्यवस्था सुधारण्याचा व कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आला होता. त्यावर उत्तर देण्यासाठी सीपी क्लब प्रशासनाने वेळ मागितला. त्यानंतरही कुठलीही सुधारणा झाली नाही. शेवटी एफडीएने परवाना निलंबनाची कारवाई केली.एक वर्षापूर्वी मिळालेल्या तक्रारीवरून १७ नोव्हेंबर २०१५ ला एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सीपी क्लबची तपासणी केली होती. यात पाण्याच्या टाकीत घाण आढळली. टाकी स्वच्छतेचा कुठलाही रेकॉर्ड क्लबकडे नव्हता. कर्मचाऱ्यांचा मेडिकल अहवाल, पेस्ट कंट्रोलचा अभाव, शाकाहारी व मांसाहारी अन्न एकाच फ्रीजमध्ये ठेवलेले आढळले. पाण्याच्या सॅम्पलचाही रिपोर्ट नव्हता. किचनमध्ये काम करणाऱ्यांनी अॅप्रॉन, कॅप व हॅन्डग्लोव्हज घातलेले नव्हते. कचरापेटी उघडी होती. किचनची चिमणी साफ केलेली नव्हती. त्यामुळे १० मे २०१६ रोजी एफडीएचे अधिकारी एन.आर. वाकोडे यांनी द बेकर्स सीपी क्बलचा परवाना निलंबित करण्याचा आदेश दिला. (प्रतिनिधी)ही माहिती सार्वजनिक का केली नाहीग्राहकांचे हित लक्षात घेता सीपी क्लबमधील घाणीचे प्रकरण मीडियाच्या माध्यमातून जाहीर करणे आवश्यक होते. परंतु एफडीएचे सहआयुक्त देसाई यांनी तसे केले नाही. एफडीएने याप्रकरणी ग्राहकांच्या हिताकडे दुर्लक्ष करून व्यवस्थापकाचे हित जोपासण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात पुढे काही निष्काळजीपणा झाल्यास अॅन्टी अॅडल्ट्रेशन सोसायटी न्यायालयाचा दरवाजा ठोठावेल.-मो. शाहिद शरीफ, अध्यक्ष अॅन्टी अॅडल्ट्रेशन सोसायटी
सीपी क्लबचा परवाना निलंबित
By admin | Published: May 27, 2016 2:39 AM