शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
7
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
8
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
9
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
10
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
11
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
12
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
13
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
14
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
15
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
16
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
17
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
18
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
19
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
20
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”

बीटीपीतील संशयास्पद मृत्यूचे रहस्य गडद

By admin | Published: September 15, 2015 6:17 AM

पूर्वा हेडाऊच्या संशयास्पद मृत्यूमुळे चर्चेत आलेल्या बीटीपी फार्महाऊसमध्ये यापूर्वी असेच काही संशयास्पद मृत्यू

नागपूर : पूर्वा हेडाऊच्या संशयास्पद मृत्यूमुळे चर्चेत आलेल्या बीटीपी फार्महाऊसमध्ये यापूर्वी असेच काही संशयास्पद मृत्यू झाले. मात्र, ते पद्धतशीर दडपले गेल्याची कुजबूज वाढली आहे. दरम्यान, चार दिवस होऊनही पूर्वा हेडाऊच्या मृत्यूमागचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलेले नाही.या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी सिराज शेख याची पोलीस कोठडी संपली. त्यामुळे बीटीपीत यापूर्वी झालेल्या अन्य काही संशयास्पद मृत्यूंप्रमाणेच पूर्वाच्या संशयास्पद मृत्यूचे रहस्य गडद झाले आहे. दरम्यान, दडपण्यात आलेल्या मनोज काटगाये मृत्युप्रकरणाची फाईल ग्रामीण पोलिसांनी उघडली असून, त्यातील तथ्य तपासण्यासाठी सिराजला अटक करून त्याची दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळविण्यात आली आहे.दिघोरीतील रहिवासी मनोज वासुदेवराव काटगाये (वय २७) आपल्या मित्रांसह ७ सप्टेंबरला बीटीपी फार्महाऊसवर पार्टीसाठी गेला होता. प्रसाद माढेकर, अभिजित बोढारेच्या वाढदिवसानिमित्त ही पार्टी आयोजित करण्यात आली होती, अशी माहिती आहे. त्यात १५ जण सहभागी झाले होते. ४०० रुपये प्रत्येक तरुणाकडून घेतल्यानंतर नेहमीप्रमाणे याही पार्टीत दारू आणि अन्य अंमलीपदार्थाच्या वापरासाठी आणि गैरप्रकारासाठी हे फार्महाऊस मोकळे करून देण्यात आले. पार्टीत सहभागी झालेला मनोज स्विमिंग पूलमध्ये बुडाला. त्याला बेशुद्धावस्थेत नागपुरात पाठविण्यात आले. एका खासगी रुग्णालयात त्याचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केल्यानंतर हुडकेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून चुप्पी साधली. मनोज प्रकरणाची कुणकुण कळमेश्वर पोलिसांना लागली होती. मात्र, सिराज आणि या फार्महाऊसचे व्यवस्थापन करणारी ‘आंटी’सोबत सलोख्याचे संबंध असल्यामुळे कळमेश्वर पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी मनोजचे संशयास्पद मृत्युप्रकरण त्यावेळी दडपले गेले. मात्र, पूर्वाच्या मृत्यूमुळे मनोजच्याही संशयास्पद मृत्यूला वाचा फुटली. पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग यांनी स्वत: या प्रकरणाची फाईल मागून घेतल्यामुळे नाईलाजाने कळमेश्वर पोलिसांनी सिराज शेखवर गुन्हा दाखल केला. त्याला सोमवारी कोर्टात हजर करून त्याची दोन दिवसांची कोठडीही मिळविली. विशेष म्हणजे, या फार्महाऊसवर बांधकाम सुरू असताना काही महिन्यांपूर्वी एका मजूर दाम्पत्याच्या मुलाचा करुण अंत झाला होता, अशी चर्चा आहे. ते प्रकरणही पद्धतशीर दडपले गेले. पोलीस त्या प्रकरणाचे खोदकाम करणार काय, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. (प्रतिनिधी) इतर ठिकाणांचे काय होणार? ४बीटीपीसारखेच गैरप्रकरण ग्रामीण भागातील अनेक फार्महाऊस, रिसोर्ट आणि बारमध्ये सुरू आहे. तेथेही डर्टी पार्ट्यांच्या आयोजनासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाते. काही बारचे मध्यरात्रीनंतर चक्क डान्सबारमध्ये रूपांतर होते. त्या क्षेत्रातील पोलिसांसोबत देण्या-घेण्याचे व्यवहार सांभाळले जात असल्यामुळे डान्सबारकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप आहे. दोन आठवड्यांपूर्वी काटोल परिसरातील बारमध्ये असाच एक प्रकार घडल्याची माहिती आहे.