लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बुकर पुरस्कारप्राप्त लेखिका व मानवाधिकार कार्यकर्त्या अरुंधती रॉय यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित फौजदारी अवमानना याचिकेवरील कार्यवाहीस सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी अंतरिम स्थगिती दिली. या आदेशामुळे रॉय यांना तूर्तास दिलासा मिळाला.माओवादी डॉ. गोकराकोंडा नागा साईबाबाच्या जामिनावरून लिहिलेल्या लेखात न्यायव्यवस्थेवर अतिशय गंभीर व निंदास्पद आरोप केल्यामुळे रॉय यांच्याविरुद्ध नागपूर खंडपीठाचे तत्कालीन न्यायमूर्ती अरुण चौधरी यांनी स्वत:च फौजदारी अवमानना याचिका दाखल करून घेतली होती. या निर्णयाला रॉय यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
अरुंधतींवरील अवमानना कारवाईस स्थगिती
By admin | Published: July 04, 2017 5:13 AM