नागपूर : ‘सूत्र’चे वेडिंग एडिशन द इंडियन फॅशन एक्झिबिशनचे आयोजन १५ डिसेंबरपासून रामदासपेठ येथील एका हॉटेलमध्ये होणार आहे. दोन दिवसीय प्रदर्शन १६ पर्यंत चालणार आहे. सर्वोत्तम सिलेक्शन तसेच आकर्षक व अनोखे फॅशन आणि लाईफस्टाईलची उत्पादने एका चांगल्या ठिकाणी आणि उत्तम वातावरण उपलब्ध करून देण्याचा ‘सूत्र’चा दृष्टिकोन आहे. आमच्या सर्व संवादामध्ये प्रतिबिंबित झालेल्या मजबूत ब्रँडिंग फोकससह डिझाईन घटकांचे संकलन करण्यासाठी आमंत्रित असो, होर्डिंग्ज, जाहिराती किंवा इव्हेंट सजावट असो, त्यावर भर असतो. ‘सूत्र’मध्ये ग्राहकांना आधुनिक फॅशनेबल उत्पादने किफायत दरात देण्याचा प्रयत्न असतो. त्यामध्ये डिझायनर साडी, मॅक्सी स्कर्ट, गाऊन, रिसॉर्टवेअर, पार्टीवेअर, किड्सवेअर, स्टोल्स, स्कार्फ, एथेनिक वेअर, हॉलिडेवेअर, शूज, फूटवेअर, ग्रीष्मकालीन संग्रह, अॅक्सेसरीजमध्ये बॅग, स्लिंग्ज, केसांसाठी लागणाऱ्या वस्तू, कानातले, बांगड्या, गृहोपयोगी वस्तू, हॅण्डीक्राफ्ट, ज्वेलरी आणि बरेच काही असतात. खरेदीदारांसाठी तात्काळ खरेदीसाठी एक चांगले व्यासपीठ आहे. यात स्वत:साठी परिपूर्ण कपडे आणि उपकरणे शोधण्यासाठी बरेच पर्याय असतात. शासनाच्या नियमांचे पालन करून ‘सूत्र’मध्ये सुरक्षित खरेदी करता येणार आहे. (वा.प्र.)
‘सूत्र’ वेडिंग एडिशन उद्यापासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 4:26 AM